चिपळूण बॅकवॉटर सफारी sakal
गोवळकोटपासून ३ किलोमीटर्सच्या अंतरात ही सफर घडवण्यात येते. या मगरी सुमारे ८ ते १० फूट लांबीच्या आहेत. एका फेरीत जवळपास १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. पण त्यासाठी समुद्राला ओहोटी असली पाहिजे. वाशिष्ठी खाडीकिनारी भरपूर मगरी बघायला मिळतात. त्यामुळे प्राणीप्रेमींबरोबरच इतरांचीही या मगरी पाहायला गर्दी होत असते. वाशिष्ठी खाडीत विहार करण्यासाठी पर्यटक इथे येतातच, पण त्यांचे मुख्य आकर्षण असते, ते इथल्या मगरींचे.ओहोटीच्या वेळी बोटीतून मगरी बघायला धमाल येते. वर कव्हर असलेली १५ सीटर स्पीडबोटीतून क्रोकाडाइल सफारी घडवली जाते. त्यातून खाडीत मनसोक्त भटकायचे, कांदळवनात लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी पाहायच्या म्हणजे पर्वणीच ठरते.वशिष्ठी खाडी त्यातले संथ पाणी, किनाऱ्याला टीपिकल वसलेले गाव, दुसऱ्या किनाऱ्याला डोंगरांची साथ, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पक्ष्यांची ये-जा, असे अप्रतिम अनुभय घेता येतो.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.