काही दिवसांवर ख्रिसमस (Christmas) आलेला आहे आणि ख्रिसमस ट्री (Christmas Tree) सजवण्याची उत्सुकता आतापासूनच अनेकांच्या मनात सुरुही झाली असेल. दरवर्षी या वेळी ख्रिसमस ट्री कशी सजवायची, या विचारात तुम्ही असाल, बरोबर ना. विशेषत: मुलांच्या मनात त्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. तुम्ही अनेक वेगवेगळ्या वस्तू एकत्र करून ख्रिसमस ट्री सजवू शकता किंवा तुम्ही थीमचा (Theme) विचार करू शकता आणि त्यानुसार ख्रिसमस ट्री सजवू शकता. तुम्ही कार्टून पोस्टर्स (Cartoon Posters) लागू करू शकता, संबंधित आयटम (Items) निवडू शकता किंवा विशिष्ट थीम निवडू शकता. चला तर मग ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी काही टिप्स पाहूयात.
लाइट थीम (Light theme):
तुम्ही ख्रिसमसच्या झाडावर रंगीबेरंगी लाइट्स (Lights) लावा, हे चमचमणारे झाड खूप आकर्षक दिसेल. तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात ख्रिसमस ट्री (Christmas Tree)ठेवा आणि त्यावर रंगीबेरंगी लाइट्स लावा. आता लाइट्समध्ये शायनिंग्स बॉल्स (Shining Balls)आणि रिबन्स लावा.कँडी थीम (Candy theme):
अशा प्रकारे ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी, वर एक ब्राइट स्टार (Bright Star)लावा, आता त्यावर फुगे (Balloons) ठेवा. यानंतर, झाडाच्या फांद्या कँडीज (Candies) आणि चॉकलेट्स (Chocolates), लहान गिफ्ट बॉक्स (Gift box), बॉल (Balls)इत्यादींनी सजवा, ते खरोखरच मस्त दिसेल.मेसेज देणारे ख्रिसमस ट्री (Message giving Christmas tree):
ख्रिसमस ट्री अशा प्रकारे सजवा की त्याद्वारे तुम्ही लोकांना खास मेसेजही (Message) देऊ शकता. यासाठी झाडाला सजवण्यासाठी बॉल्स, फुगे आणि रिबनसह Love All, Peace, आणि God Is One आहे, असा मेसेज देणारे पोस्टकार्ड लावू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही पृथ्वी वाचवा, पाणी वाचवा किंवा पर्यावरण वाचवा यासारख्या थीमवर देखील काम करू शकता.कॅंन्डल थीम (Candle theme):
ख्रिसमसच्या झाडावर कागदी मेणबत्त्या (Candles)ठेवल्या तर ते खूप आकर्षक दिसते. गिफ्ट पेपर (Gift paper) किंवा क्राफ्ट पेपरमधून (Kraft paper) पेपर मेणबत्त्या सहजपणे बनवता येतात. तुम्ही ख्रिसमसच्या झाडाच्या वरच्या बाजूला चमकदार रंगाचा स्टार (Brightly colored star)लावा आणि नंतर कागदाच्या मेणबत्तीने सजवा. आता ख्रिसमसच्या झाडाभोवती मोठ्या मेणबत्त्या लावा, ते खूप सुंदर दिसेल.व्हाइट अॅन्ड रेड थीम (White and Red theme):
पांढरा कापूस (White cotton)घ्या आणि ख्रिसमसच्या झाडाला थोडेसे झाकून ठेवा. आता ख्रिसमस ट्रीला लाल कलरचे बॉल्स (Balls), रिबन (Ribbon) आणि ख्रिसमसशी संबंधित इतर सामानांनी सजवा. सांताचा मास्क (Santas mask)झाडासमोर लावा, तो आणखी सुंदर दिसेल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.