Cold Weather Increased In Mahabaleshwar esakal
महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे.
महाबळेश्वर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरात दवबिंदू गोठले आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांत रूपांतर झाले, त्यामुळे सर्वत्र हिमकणांची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसत होते.महाबळेश्वर परिसरातील तापमानाचा पारा ०४ अंशापर्यंत खाली गेल्याची माहिती मिळत आहे.वेण्णालेक परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये- जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी जेटीवर हिमकण जमा झाल्याचे चित्र दिसले, तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने झाडेझुडपांवर देखील हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला, तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा दवबिंदू गोठून हिमकणात रूपांतर होण्याची अंदाज आहे.महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून, वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. (प्रमोद इंगळे : छायाचित्रसेवा)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.