Commonwealth Games 2022 Closing Ceremony Punjabi Bhangra esakal
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा 2022 चा सांगता समारंभ 8 ऑगस्ट रोजी पार पडला. सांगता समारंभ बर्मिंगहमच्या अलेक्झांडर स्टेडियममध्ये आयोजिक केला होता. हा सांगता समरांभात अनेक रंगारंग कार्यक्रम झाले. या सांगता समारंभात बर्मिंगहमच्या इतिहासाचे अनेक पैलू दाखवण्यात आले. ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांनी 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धच्या सांगतेची घोषणा केली. 11 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 72 देशांच्या 5 हजारापेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोदवला होता. राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांगता समारंभात भारतीय संस्कृतीचे देखील दर्शन झाले. या सांगता समारंभात 40 पॉप बँड, अपाचे इंडियन, पंजाबी एमसी आणि डक्सी या सारख्या कलाकारांनी देखील सहभाग नोंदवला. पंजाबी एमसीच्या 'मुंडिया तू बचके रही' या गाण्यावर उपस्थित प्रेक्षक चांगलेच थिरकले. बर्मिंगहमची प्रसिद्ध रॉक स्टार ओझी ओस्बॉर्न यांनी देखील आपला जलवा दाखवला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पूर्वीपेक्षा अधिक खेळांचा समावेश करण्यात आला होता. यात महिला क्रिकेट टी 20 राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आले होते. गेल्या 11 दिवसात 5000 पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेतील विविध खेळात आपला सहभाग नोंदवला होता. राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांगता समारंभात राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडे सोपवण्यात आला. पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये करण्यात येणार आहे. पुढची 23 वी राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये होणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट येथे 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.