Congress MP Adhir Ranjan Chaudhary esakal
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यामुळं खळबळ उडालीय.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं खळबळ उडालीय. चौधरी यांच्या वक्तव्यावर भाजपनं तीव्र आक्षेप घेतलाय. या विधानाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केलीय. त्याचवेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या (BJP) महिला खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अधीर रंजन चौधरी यांनी मुर्मू यांच्यासाठी राष्ट्रपतीऐवजी 'राष्ट्रीय पत्नी' असा शब्द वापरला. या प्रकरणावर काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली असून अधीर रंजन यांनी आधीच आपली चूक मान्य केलीय, त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलंय.अधीर रंजन म्हणाले, राष्ट्रपतींऐवजी माझ्या तोंडून चुकून 'राष्ट्रीय पत्नी' असा शब्द प्रयोग झालाय. मग, मला फाशी देणार का? असा सवाल त्यांनी केलाय. अधीर रंजन चौधरी दीर्घकाळ लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय.1). फेब्रुवारी 2020 मध्ये अधीर रंजन यांनी काश्मीरबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. काश्मीर भौगोलिकदृष्ट्या भारतासोबत असेल, पण भावनिकदृष्ट्या भारतासोबत नाहीय. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्या विरोधात सार्वजनिक सुरक्षा कायदा (पीएसए) लागू केल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.2). जून 2019 मध्ये अधीर रंजन यांनी पीएम मोदींबद्दल गलिच्छ विधान केलंय. पीएम मोदींबाबत ते म्हणाले, कुठं आई गंगा आणि कुठं ही घाण नाली, असं रंजन यांनी मोदींना म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनी माफी मागितली होती. माझं हिंदी फारसं चांगलं नाही आणि 'नाली' म्हणण्याचा अर्थ 'छोटी नदी' असा होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.3). बशीरहाटमध्ये काँग्रेसच्या जाहीर सभेत अधीर रंजन चौधरी म्हणाले, 'मी पाकिस्तानी आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा.' पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधत ते पुढं म्हणाले होते की, दिल्लीचे लोक जे म्हणतील ते आम्हाला मान्य करावं लागेल, अन्यथा आम्ही देशद्रोही होऊ, अशी त्यांनी मोदींवर टीका केली होती.4). या वर्षी मे महिन्यात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, जेव्हा एखादं मोठं झाड पडतं, तेव्हा पृथ्वी हादरतं. नंतर हे ट्विट डिलीट करुन काँग्रेस नेत्यानं स्पष्टीकरणही दिलं. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट दाखवत म्हटलं की, "हे 21 मे 2022 चं ट्विट आहे, जेव्हा एक मोठं झाड पडतं, तेव्हा पृथ्वी हादरते आणि जेव्हा पृथ्वी हादरते, तेव्हा हजारो नागरिकांचा बळी जातो. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपनं केली होती.5). बंगाल निवडणुकीवेळी अधीर यांनी तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना वेडा म्हटलं होतं. धनखर यांनी अर्जुनाच्या बाणाची तुलना परमाणू अस्त्रांशी केली होती. यावर काँग्रेस नेत्यानं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, “काही वेडे रुग्णालयातच राहत नाहीत, तर काही बाहेरही राहतात, असं त्यांनी म्हटलं होतं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.