फूड स्टाइलिस्ट फूड स्टाइलिस्ट
नागपूर : छान सजवलेली एखादी डिश समोर आणून ठेवली की तोंडाला पाणी सुटते. तो पदार्थ कधी एकदा खातो असे होऊन जाते. खाण्या-पिण्याची आवड असेल तर तुम्ही फूड स्टायलिंगचे करिअर निवडू शकता.
काही वर्षांपूर्वीपर्यंत फूड स्टायलिंगचे क्षेत्र ॲण्ड फिल्म, पिंट्र आणि फूड पॅकेजिंगपुरते मर्यादित होते. परंतु, आता या क्षेत्रातल्या संधींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्वयंपाकाची पुस्तके, मासिके, जाहिराती, चित्रपटनिर्मिती संस्था, कुकिंग शो यात फूड स्टायलिस्टची मागणी बरीच वाढली आहे.फूड स्टायलिंग म्हणजे पदार्थ आकर्षक रूपात सादर करणे. फूड मॅगझिन्स किंवा पुस्तकांमध्ये छान सजवलेल्या डिश आपण बघतो. हे पदार्थ पाहताच खावेसे वाटतात. हेच फूड स्टायलिस्टचे काम असते.अन्नपदार्थांचे फोटो शूट केले जाते. याची जबाबदारीही फूड स्टायलिस्टची असते. फूड स्टायलिस्ट बनण्यासाठी कलनरी आर्टमध्ये प्राथमिक प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळविल्यानंतरही फूड स्टायलिस्ट म्हणून करिअर करता येईल. फोटोग्राफची आवड असेल किंवा प्रशिक्षण घेतले असेल तर या क्षेत्रात या कौशल्याची मदत होईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.