सध्या जगभरात कोरोना आणि त्याचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनने थैमान घातले आहेत. यावेळी आपण स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी 8 मेडिकल गॅजेट्स घरी किंवा सोबत असायलाच हवेत.
पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter):
पल्स ऑक्सिमीटर हे कोरोना महामारीच्या काळात सर्वात महत्त्वाचे वैद्यकीय उपकरण बनले आहे, जे आजकाल प्रत्येकाकडे घरी असले पाहिजे. कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की तेच पल्स ऑक्सिमीटर विकत घ्या जे पल्स रीडिंग देखील दर्शवते. किंमतीबद्दल बोलायचे तर, ऑक्सिमीटर ऑनलाइन आणि ऑफलाइन मेडिकल स्टोअरमध्ये 500 ते 2,500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
इन्फ्रारेड थर्मामीटर (Infrared Thermometer):
कॉन्टॅक्टलेस किंवा IR थर्मामीटर कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय 1-2 इंच अंतरावरून शरीराचे तापमान मोजू शकतात. हे थर्मामीटर ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर 1,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सहज मिळू शकतात.ब्लड ग्लुकोज मॉनिटर (Blood Glucose Monitor):
सर्व मधुमेहींना त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी ग्लुकोमीटर आवश्यक आहे. एका ग्लुकोमीटरची किंमत 500 ते 3,000 रुपयांपर्यंत असते.
बीपी मशीन (BP Machine):
डिजिटल बीपी मॉनिटर (BP Monitor) हे घरी ठेवण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपकरण आहे. एका ब्लड प्रेशर मॉनिटरची किंमत 3,000 रुपये आहे.
अतिनील निर्जंतुकीकरण (UV Sterilizer):
FDA म्हणते की ते SARS-CoV-2 विषाणूविरूद्ध देखील प्रभावी असू शकते, ज्यामुळे कोरोनाव्हायरस होतो. यूव्ही स्टेरिलायझर (UV Sterilizer) गॅझेट आणि इतर उपकरणे जंतू आणि संक्रमणांपासून मुक्त ठेवण्यास मदत करते. हे विविध आकारात येतात. उदा, तुम्ही UV स्टेरिलायझर स्टिक किंवा बॉक्स किंवा OTG सारखे डिझाइन खरेदी करू शकता. चांगल्या UV निर्जंतुकीकरणाची किंमत 1,000 रुपयापासून सुरू होते.
पोर्टेबल होम ऑक्सिजन केंद्रक (Portable Home Oxygen Concentrator):
श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या रूग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन देण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा वापर केला जातो. हे तुम्हाला ऑनलाइन तसेच ऑफलाइन मेडिकल स्टोअर्समधून उपलब्ध असतील. परंतु, खरेदी करण्यापूर्वी वॉरंटी डिटेल्स, सर्व्हिस नेटवर्क आणि सत्यता जरुर तपासा.कंप्रेसर नेब्युलायझर मशीन (Compressor Nebulizer Machine):
नेब्युलायझर मशीनचा वापर थेट फुफ्फुसात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी केला जातो. हे डिवाइस 1,500 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्राइज रेंजमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. कोविड 19 च्या काळात तुमच्यासोबत असणे खूप महत्वाचे आहे.पोर्टेबल कॅनमध्ये नैसर्गिक ऑक्सिजन (Natural OXYGEN in Portable Can):
वैद्यकीय सेवा येईपर्यंत श्वासोच्छवासाच्या बाबतीत पोर्टेबल ऑक्सिजन कॅन असणे खरोखर उपयुक्त ठरू शकते. हे केवळ शॉर्ट-टर्मसाठी आहे, ते योग्य वैद्यकीय उपाय बदलू शकत नाही. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही याचा वापर करू शकता, परंतु यावेळी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.