नागपूर : कोरोनामुळे हातांच्या स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आले आहे. वारंवार हात धुणे आणि शक्य नसेल तर सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. म्हणूनच सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, सॅनिटायझरचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो. सॅनिटायझरमधल्या अत्यंत घातक आणि हानिकारक रसायनांमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे संशोधनातून समोर आले आहे. (Coronavirus-Sanitizer-Chemicals-endanger-health-Researchers-opinion-nad86)
सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे दृष्टिदोष निर्माण होण्यासोबतच मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हातांवरील जंतू नष्ट करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करा.सॅनिटायझर्समध्ये तीन प्रकारच्या अल्कोहोलचा वापर होतो. यापैकी एक म्हणजे मेथेनॉल. हे मेथेनॉल खूप घातक ठरू शकते. म्हणूनच अमेरिकेत मेथेनॉलयुक्त सॅनिटायझर्सच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे.मेथेनॉलऐवजी एथेनॉल तसेच आयसोप्रोपेनॉल हे घटक अधिक सुरक्षित आहे.अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझर्समध्ये मेथेनॉलचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. याच कारणामुळे हँड सॅनिटायझर कमीत कमी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.सॅनिटायझरमधले मेथेनॉल त्वचेच्या मार्फत शरीरात शिरते आणि आरोग्याचे नुकसान करू शकते. या रसायनामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते.लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे घटकांची तपासणी करूनच सॅनिटायझर खरेदी करायला हवा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.