Relationship Tips, Don't Share Your Secrets to anyone Sakal
Relationship Tips: माणूस आपल्या कामात कितीही हुशार असो, प्रेमाचं गणित सगळ्यांनाच सुटेल असं नसते. एखाद्या व्यक्तीशी नात्यात आल्यावर कळत नकळत असे निर्णय घेतले जातात, ज्याचा परिणाम थेट त्याच्या नात्यावर होतो. बरेच लोक नात्यात आल्यावर भावनेच्या आहारी जाऊन त्यांची लव्ह लाईफ कोणासमोरही शेअर करू लागतात. नात्यातील सिक्रेट गोष्टीही लोक शेअर करतात, ज्या करणं शुद्ध वेडेपणा आहे. बऱ्याचदा भावनेच्या आहारी जाऊन इतरांशी शेअर केलेल्या काही सिक्रेट गोष्टींमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हीही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर काही गोष्टी शेअर करणे टाळावे. (Don't share secrets of your relationship with anyone)
1. भेटवस्तूंवर चर्चा करू नका- तुमच्या जोडीदाराने तुम्हाला कोणते गिफ्ट दिले आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला कोणते गिफ्ट दिले आहे हे कधीही कोणालाही सांगू नका. हा तुमच्या दोघांमधला मामला आहे. विशेषत: एखाद्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराला काय देणार आहात, अशा गोष्टी कोणालाही सांगू नका.
2. तुमच्या बेडरूममधील सिक्रेट्स- कोणी कितीही स्पेशल असो, पण तुमच्या बेडरूममधील गुपिते चुकूनही कोणाशी शेअर करू नका. आजकाल, जोडप्यांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल तणाव असतो, अशा परिस्थितीत, जेव्हा आपण अशा गोष्टी शेअर करता त्याचा वाईट परिणाम नात्यावर होऊ शकतो.
3. जोडीदाराबद्दल वाईट बोलणं- जोडप्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून भांडणे किंवा वाद होणे सामान्य आहे, परंतु तरीही आपण आपल्यातील भांडणाबद्दल कोणालाही सांगू नये. विशेषतः जोडीदारावर टीका करू नका. असे करून लोक तुमच्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू लागतात.
4.आर्थिक समस्या- घराच्या बजेटशी संबंधित समस्या किंवा भविष्यातील गुंतवणूक योजना कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या दोघांमध्ये या गोष्टी बाहेर पडल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. पैशाशी संबंधित कोणतीही बाब कोणाला सांगू नका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.