कोणत्याही कपल्ससाठी हनीमून हा नेहमीच लक्षात ठेवण्यासारखा असतो. लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी हनिमून हा एक चांगला ब्रेक असतो. हनिमूनचे नियोजन अशा प्रकारे केले पाहिजे की, जिथे तुम्हाला पूर्णपणे आराम वाटेल, त्या परिसराचा आनंद घेता येईल. हनिमूनला झालेल्या छोट्या-छोट्या चुका संपूर्ण ट्रिप खराब करते. चला जाणून घेऊया हनिमूनला कपल्सनी कोणत्या चुका करू नयेत.
लग्न ठरले की लोक हनिमूनला जाण्याचे प्लॅनिंग करायला सुरु करतात. हनिमूनच्या उत्साहात, बहुतेक कपल्समध्ये छोट्या छोट्या चुका होतात ज्यामुळे त्यांच्या ट्रिपची सगळी मजाच निघून जाते. हनिमूनला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास या चुका टाळता येऊ शकतात. सीझन न चेक करता बुकिंग करणे- तुम्ही तुमच्या हनिमूनला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी खूप प्लॅनिंग केले असेल पण लग्न आणि हनिमूनची ही वेळ भेट देण्याची योग्य वेळ नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्यानुसार तुम्ही तुमचे लग्न आणि हनिमून प्लॅन करू शकता. जर तुम्ही पावसाळ्यात कुठेही जाऊ शकत नसाल तर तुमचे लग्न योग्य ऋतूतच केले पाहिजे.
आरोग्याकडे लक्ष देवून नियोजन करा- तुम्ही कुठेही जात असाल, त्या जागेनुसार असे नियोजन करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याशी तडजोड करावी लागणार नाही. जसे की त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वॅक्सीन घेण्याची गरज आहे की नाही. त्या जागेसाठी काही विशिष्ट गाइडलाइन्स आहेत का? जाण्याआधी तुम्ही त्या जागेबद्दल चांगले रिसर्च केले तर बरे होईल. प्रवासाचे नियोजन नीट न करता येणे- प्रवासाचे नियोजन करताना छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. उदा., तुमच्याकडे पुन्हा पुन्हा फ्लाइट्स घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे का. तुम्हाला कुठे जाण्यासाठी दोन ठिकाणी फ्लाइट बदलावी लागत असेल, तर टर्मिनलचे अंतरही लक्षात ठेवा. प्रवासाचे नियोजन असे करा की ते तुमच्यासाठी शक्य होईल. लग्नानंतर लगेचच दुसऱ्या दिवसाचे प्लॅनिंग करणेही तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. जेवणात निष्काळजीपणा करु नका - तुम्ही तुमच्या हनीमूनसाठी कुठेही जात असाल तर तुम्हाला तुमच्या खाण्याकडे खूप लक्ष देणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी कोणते पदार्थ उपलब्ध आहेत, ते अन्न तुम्ही खाऊ शकता की नाही, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. नेहमी तुमच्यासोबत बाटलीबंद पाणी ठेवा. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहात आहात त्या हॉटेलमधील चांगल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल तुम्ही कर्मचारी किंवा स्थानिक लोकांशी संपर्क साधू शकता.उन्हात बराच वेळ घालवणे- थंड वातावरणात दिवसभर उन्हात झोपणे खूप छान असते पण ते तुमच्यासाठी वाईटही ठरू शकते. तुम्ही तुमच्या हनीमूनवरून सनबर्नसह परत येऊ शकता. सनस्क्रीन वापरा, हायड्रेटेड रहा आणि कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. बेडरूमध्येच राहणे- हनिमूनमध्ये जोडीदारासोबतचे खास क्षण एन्जॉय करण्यासाठी बरेच जण बेडरूममध्येच जास्त वेळ घालवतात पण संपूर्ण वेळ रूममध्येच राहू नका. तुम्ही तुमच्या हनिमूनसाठी खूप पैसे खर्च केले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियावर पूर्ण वेळ घालवणे- हनीमूनला तुमच्या पार्टनरसोबत अधिकाधिक क्वालिटी टाइम घालवण्याचा विचार करा. या दरम्यान, सोशल मीडियापासून दूर राहा आणि तुमचे अॅक्टिविटी किंवा अनुभव सोशल मीडिया अपडेट म्हणून पाहण्याचा प्रयत्न करू नका. काही लोकांसाठी सोशल मीडियापासून दूर राहणे हे कठीण काम असू शकते, परंतु तुम्ही तुमच्या फोनलाही ब्रेक दिल्यास ते चांगले होईल. बजेटची योग्य काळजी न घेणे - तुम्हाला तुमचा हनिमून नक्कीच अविस्मरणीय बनवायचा आहे पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमची संपूर्ण बचत तुमच्या ट्रिपवर खर्च केली पाहिजे. तुमच्या लग्नासाठी आणि हनिमूनसाठी योग्य बजेट तयार करा. यामुळे तुम्हाला ट्रिपसाठी किती पैसे खर्च करावे लागतील हे समजेल. प्रवासासाठी तुम्ही जे बजेट केले आहे त्याचच वापर करा. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.