मुंबई : दिल्लीस्थित वास्तुस्थापत्यकार, शहर रचनाकार आणि कला संग्राहक कुलदीप सिंह अमूल्य अशा ३५० तंजावूर आणि मैसूर चित्रांची भेट छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला दिली. कुलदीप यांचे २०२० साली निधन झाले; मात्र तंजावूर-मैसूर चित्रांचा मोठा वारसा त्यांनी इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कलारसिकांसाठी मागे सोडला आहे. कुलदीप यांना आदरांजली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने 'थ्री डायमेन्शन्स ऑफ डिविनिटी' हे प्रदर्शन भरवले आहे.
या प्रदर्शनात मैसूर, आंध्रप्रदेश आणि केरळ येथील तंजावूर शैलीतील चित्रे पाहायला मिळतात. यात वैष्णव, शैव, शाक्त, रामायण आणि महाभारतासारखी महाकाव्ये, लोकप्रिय ग्रामदेवता, महत्त्वाच्या मंदिरांच्या स्थापत्यशैली, जैन आणि शीख धर्मावर आधारित चित्रे, इ. स. सातव्या आणि नवव्या शतकातील प्रसिद्ध वैष्णव आणि शैव कवी संत असे विषय साकारलेले आहेत.१९व्या शतकाच्या पूर्वार्धातील तंजावूर चित्रकलेचे आश्रयदाते तंजावूर राजघराण्यातील द्वितीय सर्फोजी भोसले आणि मैसूरचे तिसरे मुम्मदी कृ्ष्णराज वोडेयार यांचे व्यक्तिचित्रण असलेली चित्रेही पाहायला मिळतात. हे प्रदर्शन रिव्हर्स ग्लास पेंटींग्ज या चित्रकलेच्या माध्यमाची ओळख करून देते. प्रदर्शनाच्या शेवटच्या भागात कॅलेंडर आर्टची झलक पाहायला मिळते. तंजावूर चित्रांचे अनोखे तंत्र प्रत्यक्ष नमुन्यांच्या माध्यमातून तसेच दृकश्राव्य साधनांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. कल्पक कलाकृती ऐतिहासिक घटनांक्रमांचे रेखाटन आणि संग्राहकाची मुलाखत यांमुळे हे प्रदर्शन अधिक आकर्षक बनले आहे. मार्केंडेय अनुग्रहमूर्ती, लक्ष्मीचा उदय, पुरी येथील जगन्नाथ मंदिर समूह, कोदंड राम, मदुराई वीरन, इत्यादी विषय या प्रदर्शनातील चित्रांमध्ये दिसून येतात. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.