कोरोना आणि लॉकडाउनकाळात लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती, ती आजही कायम आहे. त्यामुळे हाॅटेल, रेस्टाॅरंट, टपरी असं सर्वकाही बंद होतं.
कोरोना आणि लॉकडाउनकाळात लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी होती, ती आजही कायम आहे. त्यामुळे हाॅटेल, रेस्टाॅरंट, टपरी असं सर्वकाही बंद होतं. अशा परिस्थितीत लोक घरी राहून वेगवेगळे पदार्थ बनविताना दिसले. चला तर, आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांविषयी सांगू, ज्याने तुमच्या जिभेला पाणी सुटेल..पाणीपुरी (Pani-puri) : लॉकडाउनकाळात लोकांनी पाणी-पुरीचा खूप आनंद लुटला. प्रत्येकाच्या घरात ही डिश केलेली पहायला मिळाली. आज काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल झाल्याने ही डिश शहरातील ठेल्यावरती मिळू लागली आहे.ढोकळा (Dhokla) : ढोकळ्याची मऊ आणि स्पंजयुक्त पोत लोकांना फार आवडली अन् ही डिश घरी बनवण्याचा खूपवेळा प्रयत्न झाला. लोकांना ही गुजराती डिश खूप खायला आवडते, म्हणूनच लॉकडाउनदरम्यान लोकांनी घरी बनवण्याचा प्रयत्न केला.मार्बल केक (Marble cake) : लॉकडाउनकाळात लोकांना मार्बल केक बनवण्याची खूप आवड होती आणि त्यांनी संध्याकाळच्या चहासोबत याचा आनंद देखील घेतला.डलगोना कॉफी (Dalgona coffee) : डलगोना कॉफी सन 2020 ची सर्वात प्रसिद्ध आणि व्हायरल डिश होती. याचा स्वाद लाॅकडाउनकाळात लोकांना खूप जाणवला. आता ही डिश घरांमध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते.मोमोज (Momoz) : भारतातील बहुतेक प्रत्येक राज्यात ही डिश आढळते. लोकांनाही दररोज ही डिश खायला आवडते. महाविद्यालयीन विद्यार्थी असोत किंवा ऑफिसमध्ये जाणारे सर्वांनाच मोमोज आवडते. हा पदार्थ आपण कितीही वेळा खाला तरी कंटाळा येणार नाही.समोसा (Samosa) : ही एक प्रसिद्ध डिश आहे, जिनं भारतीयांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ही डिश बनवण्यासाठी फार काही अवघड नाही, शिवाय चहासोबत याचा आस्वाद घेतल्यास खूपच रुचकर लागते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.