परदेशात फिरण्याची इच्छा कोणाच्या मनात नसते पण, बिझी शेड्युल आणि बजेटमध्ये न बसणारी परदेशवारी आपल्याला खिशाला मात्र परवडत नाही. पण त्यासाठी तुम्हाला निराश होण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही भारतातच घेऊ शकता परदेशात फिरल्याचा अनुभव. दिल्लीमध्ये 6 अशा जागा आहेत ज्या हुबेहुब परदेशातील जागाप्रमाणे दिसतात. तुम्ही हे सुंदर ठिकाणांना भेट दिल्यावर तुम्ही परदेशात आहात असे वाटेल.
चंपा गली(साकेत) : दक्षिण दिल्लीतील साकेत येथील चंपा गलीमध्ये खूप आलिशान कॅफे आहेत. तेथील हँडक्राफ्टची दुकान पॅरीस स्टाईलनुसार डिझाईन केले आहेत. येथील लहान लहान दगडांनी भरलेला रस्त्यावर जेव्हा स्ट्रीट लाईटचा प्रकाश पडतो तेव्हा खूप संदर दिसतो. फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड देखील तुम्हाल चंपा गलीमध्ये सहज पाहायला मिळतील.
द ग्रँड वेनिस मॉल(नोएडा) या मॉल हा स्वत:च्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. इटॅलियन थीमवर आधारित हा मॉल तुम्हाला व्हेनीसमध्ये फिरण्याचा आनंद देतात. व्हेनीस सोबत तुम्ही युरोपियन स्टाईलमध्ये बनलेल्या दुकांनांच्या मध्यभागी निळ्याशार पाण्यावर बोट राईडिंगचा आनंद घेऊ शकता.
लोटस टेंपल : तुमच्या परदेश वारीमध्ये ओपेरा हाऊसचा समावेश असेल तर तुम्ही दिल्लीतील लोटस टेंपलला एकदा नक्की भेट द्या. कमळ या फुलाच्या आकृतीपासून बनवलेले मंदिर पर्यटकांचे मुख्य आकर्षन ठरते. मंदिरामध्ये शांत वातवरण आणि बाहेर हिरवळ आणि निळेशार पाणी हे दृश्य पाहिल्यावर तुम्हाल परत घरी जाण्याची इच्छाच होणार नाही. वेस्ट टू वंडर थीम पार्क : राजधानी दिल्लीमध्ये एकाच तुम्हाला 6 इंटरनॅशनल ठिकाण फिरल्यांचा अनुभव फक्त वेस्ट टू वंडर थीम पार्क मिळू शकतो. येथे जगभराकाची 7 आश्चर्यकारक वास्तूंची प्रतिरूप साकारले आहे. येथे इजिप्तचे ग्रेट पिरॅमिड ऑफ गिजा, रोमचे कोलसियम, ब्राजीर चे रिडीमर, न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, इटलीचे पीसा आणि आयफीएल टॉवर ही पाहायला मिळतील.
कॅनॉट प्लेस: राजधानी दिल्लीच्या केंद्रस्थानी असलेले कॅनॉट प्लेस येथी सर्वात फेमस शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. स्ट्रीट शॉपिंगमध्ये कित्येक नवीन मोठे ब्रँडचे आऊटलेट तुम्हाला येथे पाहायला मिळतील. त्याशिवाय सुंदर कॅफे, रेस्टॉरंटमध्ये देखील येथे आहेत. सेंट्रेल प्लाजा ला जॉर्जियन स्टाईलमध्ये डिझाईन केले गेले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.