कोरोनामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरले होते आहे. पण आता हळूहळू सर्वकाही पूर्ववत होत आहे. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळाही आता सुरु होत आहेत. अनेक दिवस शाळांपासून दूर असणारे विद्यार्थी आता शाळेत परतत आहेत. साहजिकच शाळेतील त्यांच्या पुनरागमनानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या चिंता असू शकते
अनेक विद्यार्थ्यांच्या घरात आर्थिक तणावासारखी काही समस्या असू शकते. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासाबरोबरच मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. याबाबतचे काही अभ्यास दर्शवतात की, शाळा बंद असल्यामुळे मुलांमध्ये नकारात्मक भावना वाढल्या आहेत. बराच काळ घरात राहणारी मुले नैराश्य, चिंता, एकाकीपणाकडे वाटचाल करत आहेत. चिंतेच्या सामाजिक आणि भावनिक परिणामांवर अभ्यास झाले आहेत, परंतु बर्याच लोकांना हे माहित नसेल की, चिंतेची ही स्थिती मुलाच्या शैक्षणिक कार्यावर देखील परिणाम करू शकते.
ऑस्ट्रेलियातील सात पैकी एका व्यक्तीला अस्वस्थतेची भावना आहे. अस्वस्थता हा मुलांमध्ये चिंतेचा विषय आहे. कारण यामुळे ६.१ टक्के मुली आणि ७,६ टक्के मुलांना प्रभावित झाली आहेत. अभ्यास दर्शवतात की, अस्वस्थतेच्या समस्या सरासरी ११ वर्षांच्या वयात येऊ शकतात. विशेष गोष्ट म्हणजे ही आकडेवारी साथीच्या आधीची आहे.परीक्षेपूर्वी तुम्हाला तणावाला सामोरे जावे लागू शकते- जर्नल फॉर द अमेरिकन मेडिकल असोसिएशनने या वर्षी ऑगस्टमध्ये एक अभ्यास प्रकाशित केला होता, त्यानुसार जगभरातील २५ टक्के तरुण क्लिनिकल एंग्जाइटीने ग्रस्त आहेत. अभ्यासात असे म्हटले आहे की, कोविड -१९ दरम्यान नैराश्य आणि चिंता लक्षणांची प्रकरणे साथीच्या आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत दुप्पट होतीपरीक्षेला जाण्यापूर्वी किंवा अशा तणावपूर्ण परिस्थितींमध्ये आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागू शकते. चिंतेत व्यक्तीला अस्वस्थता, पोटात काहीतरी हलल्याची भावना, अस्वस्थता इ. गोष्टी जाणवतातसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.