नागपूर : वाढत्या ताणतणावामुळे तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराबरोबर मनही व्याधिग्रस्त होऊ शकते. मात्र, आजही मानसिक दुखण्यावर फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे डिप्रेशन वाढू शकते. हे टाळायचे तर काही बाबींची दखल घ्यायला हवी.
चिप्स, इन्स्टंट नूडल्स अथवा यासारखे प्रोसेस्ड फूड आहारात असेल तर त्यातील विषाक्त घटकांमुळे मेंदूतील रसायनांमध्ये असंतुलन निर्माण होते. परिणामी डिप्रेशनचा धोका वाढतो. म्हणूनच प्रोसेस्ड फूड आहारातून वज्र्य करास्वउन्नतीसाठी एकांतवास महत्त्वाचा असला तरी दिवसेंदिवस एकटे राहणे, समाजात न मिसळणे ही नकारात्मकता वाढवणारी बाब ठरते.सोशल मीडियाचा अतिरेक वापर तुम्हाला नैराश्याकडे झुकवू शकतो. नातलगांशी संवाद खुंटणे आणि आभासी विश्वात रमणे ही बाब मेंदूतील काही घटकांच्या असंतुलनाला कारणीभूत ठरते.नकारात्मक विचार असणाऱ्या माणसांच्या सानिध्यात राहिल्यासही डिप्रेशनाचा धोका संभवतो.अतिरेक धूम्रपान ही व्यसनी लोकांना डिप्रेशनमध्ये ढकलणारी बाब ठरते. निकोटीनच्या प्रभावामुळे रासायनिक असंतुलनाचा तो परिणाम असतो.शारीरिक हालचालींचा अभाव, निष्क्रिय जीवनशैली, महिलांमध्ये जन्मनियंत्रण गोळ्यांचे सेवन आदी कारणांमुळेही डिप्रेशन वाढू शकते.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.