दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हाॅलीवूडमध्ये जोरदार पदार्पण केले आहे. त्याच्या द ग्रे मॅन चित्रपटाचे चौहूबाजूंनी चर्चा सुरु आहे. अॅव्हेंजर्सचे दिग्दर्शक जो आणि अँथनी रुसो यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात धनुष खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. देश-विदेशात त्यांच्या अभिनयाचे कौतूक होत आहे. आम्ही तुम्हाला धनुष विषयी ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही त्याबाबत सांगणार आहोत.त्यानंतर त्याने अनेक सर्वोत्तम तामिळ आणि मग तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. २०१२ मध्ये धनुष व्हाय दिस कोलाव्हरी डी गाण गाऊन देशभरात खळबळ माजवून दिले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने चित्रपट रांझणामध्ये सोनम कपूरबरोबर काम केले. या चित्रपटात धनुषचे काम अप्रतिम होते. देशभरात त्याचे कौतुक झाले.
धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असे आहे. प्रसिद्ध तामिळ दिग्दर्शक कस्तुरी राजा हे त्यांचे वडील आहेत. धनुष अगोदर चित्रपट उद्योगाचा भाग बनू इच्छित नव्हता. त्याला हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये जाऊन शेफ बनायचे होते. मात्र त्याचा भाऊ आणि दिग्दर्शक सेल्हा राघवनने त्याला अभिनेता बनण्यास प्रेरित केले.
१९९५ मध्ये आलेला तामिळ चित्रपट कुरुथीपुनलमधून त्याने आपले स्टेज नेम धनुष घेतले होते. २००२ मध्ये चित्रपट थुलूवढो इलामईमधून चित्रपट क्षेत्रात धनुषने पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच्याच वडिलाने केले होते. हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. त्याचा दुसरा चित्रपट 'कधाळ कोण्डेन'लाही चाहत्यांनी डोक्यावर घेतले होते.
त्यानंतर त्याने अनेक सर्वोत्तम तामिळ आणि मग तेलगू चित्रपटांमध्ये काम केले. २०१२ मध्ये धनुष व्हाय दिस कोलाव्हरी डी गाण गाऊन देशभरात खळबळ माजवून दिले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्याने चित्रपट रांझणामध्ये सोनम कपूरबरोबर काम केले. या चित्रपटात धनुषचे काम अप्रतिम होते. देशभरात त्याचे कौतुक झाले.
१८ नोव्हेंबर २००४ मध्ये धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी विवाह केला होता. त्याला दोन मुल आहेत. एक यात्रा आणि लिंगा. जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दोन्हीही परिवार त्यांचा विवाह टिकावा यासाठी प्रयत्न करित आहेत.
धनुषने असुरन, मारी, थोडारी, कोडी, वेलैल्ला पत्तधारी २ सारख्या सर्वोत्तम चित्रपटात अभिनय केले आहे. त्याने दिग्दर्शन, निर्माता, गीतकार आणि गायक म्हणून काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे देश आणि विदेशात चाहते आहेत.
बाॅलीवूडमध्ये धनुषने रांझणा व्यतिरिक्त शमिताभ आणि अतरंगी रे चित्रपटात काम केले. आपल्या सर्वोत्तम अभिनयासाठी धनुष राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि विजय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार आदुकलमसाठी मिळाला होता. या व्यतिरिक्त दुसरा पुरस्कार असुरनसाठी मिळाला होता.
द ग्रे मॅनमधून हाॅलीवूडमध्ये धनुषने पदार्पण केले आहे. दिग्दर्शक द्वयी जोडी रुसो ब्रदर्सने अगोदरच म्हटले होते, की ते धनुष आणि त्याच्या कामाचे चाहते आहेत. धनुष बरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे एका मुलाखतीत रुसो ब्रदर्सने सांगितले आहे. यातून स्पष्ट होते की धनुष आता हाॅलीवूडमध्येही आपला दमदार ठसा उमठवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.