Petrol Car and Diesel Car Esakal
Petrol Car and Diesel Car: कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. कार खरेदी करण्यापूर्वी कार कोणती घ्यावी, याबाबत मनात गोंधळ झालेला दिसतो आणि एखादी कार (Car) निवडली तरी त्यातही ती पेट्रोल (Petrol) घ्यावी की डिझेल (Disel) घ्यावी हा सुद्धा प्रश्न पुढे येतो. पेट्रोल आणि डिझेल इंजिन असणाऱ्या कारमध्ये अनेक गोष्टीत फरक असतो. आज आपण याच फरकाबद्दल जाणून घेणार आहोत. (Difference between petrol and diesel cars? Find out.)
1.कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कार कोणत्या कारणासाठी खरेदी करणार आहात, ते पक्कं असलं पाहिजे. तुम्ही कारमधून रोज किती प्रवास करणार आहात, हे स्पष्ट असायला हवे. जर दररोज 50 किमीपेक्षा जास्त कार चालवणार असाल तर तुम्ही डिझेल कार घ्यायला हवी. 2. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त असते आणि मायलेजही अधिक मिळते. 3. जर तुम्ही तुमची कार साधारणपणे 20 किलोमीटरपेक्षा कमी चालवणार असाल तर तुम्ही पेट्रोल कार घेऊ शकता. 4. थोडक्यात डिझेल किंवा पेट्रोल कार घेण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की, तुमची कार रोज किती किमी चालणार आहे. कारण दोन्ही इंजिनच्या मायलेजमध्ये खूप अंतर आहे. 5. याशिवाय पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कार महाग असतात. म्हणजेच एकाच कारचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट यामध्ये डिझेल व्हेरिएंट महाग असेल. 6. डिझेल कारला तुम्हाला वेळोवेळी देखभाल करावी लागते. जर तुम्ही व्यावसायिक कारणासाठी गाडी घेणार असाल तर तुम्ही डिझेल कारच खरेदी करायला हवी. 7. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल इंजिनची लाईफ कमी असते. पेट्रोल कार साधारणपणे 15 वर्षे चालवता येऊ शकते, तर डिझेल कार 10 वर्ष चालवता येऊ शकते. 8. डिजल इंजिनचा पिकअप पेट्रोलच्या तुलनेत खूप चांगला असतो. टॉर्क चांगला असल्यामुळे पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कार खूप उंच चढ आरामात चढू शकते. डिझेल इंजिनमधून NO2 चं उत्सर्जनसुद्धा जास्त होते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.