प्रत्येक स्त्रीला चांगले, लांब, मजबूत आणि सुंदर केस असावेत अशी इच्छा असते. केसांची काळजी घेणे सोपे काम नाही कारण छोट्या छोट्या चुकांमुळे केस झपाट्याने खराब होऊ लागतात. हेयर एक्सपर्ट्सच्या मते, जर तुम्हाला तुमचे केस जास्त काळ चांगले ठेवायचे असतील तर हे काम ओल्या केसांमध्ये करू नका.
बहुतेक स्त्रियांना असे वाटते की केस व्यवस्थित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ओल्या केसांवर ब्रश करणे. तर केस ओले असताना ते खूप कमकुवत होतात आणि त्यात ब्रश लावल्याने ते सहज तुटू लागतात.ओल्या केसांमध्ये कधीही झोपू नका. कारण ते टाळूच्या फॉलिसेलला नुकसान पोहोचवते. जर तुम्ही रात्री केस धुत असाल तर ते पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच अंथरुणावर झोपा.ओल्या केसांचा अंबाडा बनवणे चांगले वाटत असेल पण ते केसांसाठी खूप हानिकारक आहे. ओले केस कमकुवत असतात, अशा स्थितीत अंबाडा बनवताना किंवा रबर बँडने बांधताना ते लगेच तुटायला लागतात.
काही लोक ओले केस लवकर सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर वापरतात. बाथरूममधून बाहेर पडताच ब्लो ड्रायरचा वापर करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. सुरवातीला केस थोडे कोरडे करा, नंतर हलक्या ओल्या केसांवर ड्रायर वापरा. ड्रायर सेटिंग नेहमी मीडियम ठेवा आणि हळूहळू ते हाई करा.
बऱ्याच लोकांना वाटते की, केस हवेत कोरडे करणे ही एक नैसर्गिक पद्धत आहे जी केसांसाठी चांगली आहे. हा लोकांमध्ये मोठा गैरसमज आहे. केस हवेत वाळवल्याने केस खराब होतात आणि विंचरल्यावर तुटायला लागतात. त्याचप्रमाणे टॉवेलने केस कधीही वाळवू नका. यामुळे केसही तुटतात.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.