सर्वसामान्य स्त्री-पुरुषांपेक्षाही वेगळा लिंगभाव असलेली व्यक्तिमत्त्वे अस्तित्त्वात असतात; पण आपल्याला त्यांच्याबद्दल फार थोडी माहिती असते. अशाच ७ वेगवेगळ्या लिंगभावांबद्दल जाणून घेऊ या.
पॅनसेक्शुअल -
स्वत:शी समान लिंग असणाऱ्या आणि भिन्न लिंग असणाऱ्या व्यक्तींसोबतच तृतीयपंथी, समलिंगी यांच्याविषयीचेही आकर्षण असते. डेमीसेक्शुअल -
डेमी म्हणजे अर्धा. डेमीसेक्शुअल व्यक्तींना कोणाशीही लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी त्या व्यक्तीशी तीव्र भावनिक जवळीक होणे आवश्यक असते. त्याशिवाय ते कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवत नाहीत.
मोनोसेक्शुअल -
या व्यक्तींना एकाच लिंगाबद्दल आकर्षण असते. भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तीविषयीचे हे आकर्षण असते.
बायसेक्शुअल -
या व्यक्ती भिन्न आणि समान दोन्ही लिंगांच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात. अॅसेक्शुअल -
या व्यक्तींना लैंगिक संबंध ठेवण्यात निसर्गत:च रस नसतो. ग्रे - ए
या व्यक्तींना ठरावीक प्रसंगी लैंगिक संबंधांची इच्छा होते; पण काही वेळा तशी इच्छा नसते. ऑटोसेक्शुअल
या व्यक्तींना स्वत:च्याच शरीराचे आकर्षण असते. स्वत:ला आरशात बघून या व्यक्ती स्वत:च्या विवस्त्र प्रतिमेची कल्पना करतात. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.