कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. प्रौढांसाठी दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आणि 70 वर्षांवरील प्रत्येकाला दररोज 1,200 मिलीग्राम , तर 4-18 वयोगटातील मुलांना 1,300 मिलीग्राम कॅल्शियम घेण्याचा सल्ला दिला जातो. दुधामधून मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम मिळते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण कित्येकांना दुध अजिबात आवडत नाही. दुधाचा वासही सहन होत नाही त्यामुळे कित्येकजण दुग्धजन्य पदार्थांचे सेवनही करत नाही. दुधाशिवाय तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची कमी कशी पूर्ण होणार? दुधामधून मिळणाऱ्या कॅल्शिअमची कमी पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतर काही पदार्थांचेे सेवन करू शकता. असेच काही पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
खसखस:
दररोज 20 ग्रॅम खसखसचे सेवन केल्यास तुम्हाला एक ग्लास दुधातून मिळाणारे कॅल्शिअम मिळते. तुम्ही खसखसचे पेय किंवा हलवा किंवा खीर बनवून मिठाई सारखे खाऊ शकता सब्जा
दररोज 30 ग्रॅम सब्जाचे सेवन केल्यास एक ग्लास दुधातून मिळाणाऱ्या कॅल्शिअमची कमी पूर्ण होते. पाण्यामध्ये किंवा थंडपेयामध्ये टाकून तुम्ही सब्जाचे सेवन करू शकता.
तीळ :
दोन पूर्ण भरलेले चमचे तीळाचे सेवन केल्यास तुम्हाला एक ग्लास दुधाएवढेच कॅल्शिअम मिळेल. तुम्ही तिळ-गुळाची वडी किंवा तीळाची चिक्की, तीळ टाकून केलेली भाकरी अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून तीळ खाऊ शकता. राजमा :
कच्चा 100 ग्रॅम राजमा म्हणजे 140 मिली ग्रॅम कॅल्शिअम. कच्चा राजमामधून तुम्हाला कॅल्शिअम सह कॅलरीज् ही मिळतील.बदाम :
बदाममध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. 100 ग्रॅम बदाम खाल्यास तुम्हाला 260 मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळेल.अंजीर :
अंजीरमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे खूप जास्त प्रमाण असते. तुम्हाला 8 अंजीरामधून 241 मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळेल.टोफू : टोफू म्हणजे सोयाबीनच्या दुधापासून बनविलेले पनीर. 100 ग्रॅम टोफूमध्ये 680 मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळते. याशिवाय तुम्ही ब्रॉकली, रताळे, सुर्यफुलाच्या बिया, भेंडी, संत्र्यांचे सेवन केल्यास तुम्हाला पुरेसे कॅल्शिअम मिळेल.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.