cumin water (Weight loss tips) Sakal
वजन कमी करणे (Weight loss)असो किंवा बद्धकोष्ठतेपासून सुटका असो, जिऱ्याच्या पाण्याचे सेवन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, आवश्यकतेपेक्षा जास्त जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
1. वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) जास्त जिऱ्याचे पाणी (cumin water) पिणं आरोग्यासाठी नुकसान (harmful for health) होऊ शकते.2. पचनाची समस्या - आवश्यकतेपेक्षा जास्त जिरे पाणी प्यायल्याने पचन आणि गॅस्ट्र्रिटिसशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करताना त्याच्या योग्य प्रमाणात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात घेतल्याने व्यक्तीच्या पचनक्रियेवर परिणाम होतो.3. किडनी (kidney) आणि लिव्हरवर (liver) परिणाम- जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास किडनी आणि लिव्हरशी संबंधित समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मूत्रपिंड आणि यकृताचा त्रास असेल तर प्रथम डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.4. स्तनपान (breast feeding) करताना समस्या- स्तनपान करणाऱ्या महिलांनी जिऱ्याचे पाणी सेवन केल्यास त्यांना दुधाची कमतरता भासू शकते. अशा महिलांनी ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.5. साखर - जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या असू शकते.6. गर्भपात - जिरे उष्णतावर्धक असतो. जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढतो.7. उलट्या (vomiting)- जिऱ्याच्या पाण्यात मादक गुणधर्म असतात, ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ आणि मेंदूचे कार्य बिघडते. अशा स्थितीत तुम्हाला काही समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.