Dry Fruits Increase Immunity to Avoid Omicron esa
कोरोना (Corona) विषाणूपासून बचाव करण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना-ओमिक्रॉनचे (Omicron) नवीन रुग्ण सापडले आहेत.
एकीकडे थंडीचे दिवस सुरु आहेत तर दुसरीकडे कोरोनाचा धोका. अशा परिस्थितीत, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)वाढवण्यासाठी कोणते ड्रायफ्रुट्स खाणे फायदेशीर ठरेल ते पाहूयात.बदाम (Almonds): बदामामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच याच्या सेवनाने हाडेही मजबूत होतात. बदामामध्ये (Almonds)व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. जे रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते. हे व्हायरस आणि बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करते.मनुका (kishmish): अँटी-ऑक्सिडंटने भरपूर असलेले मनुके शरीराला इंफेक्शनपासून (Infection) दूर ठेवण्यास मदत करतात. तसेच, मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी भरपूर प्रमाणात असते. तसेच, अॅन्टी-ऑक्सिडंटने (Anti-oxidant)समृद्ध मनुका शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करतात.खजूर (Dates): हिवाळ्यात खजूर (Dates) खाणे प्रत्येकासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना त्यांच्या आहारात खजूर खाण्याचा सल्ला तज्ञ देतात. पोषक तत्वांनी युक्त खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळेच तज्ज्ञ नियमितपणे खजूर खाण्याचा सल्ला देतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.