हिवाळा सुरु झालाय. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणे कठीण काम होऊन बसतं. अशा स्थितीत शरीराला पुरेसे पोषण मिळावे यासाठी तुम्ही हिवाळ्याच्या हंगामी अन्नाची मदत घेऊ शकता. या ऋतूमध्ये आढळणारे अनेक सुपरफूड केवळ तुमचे शरीर उबदार ठेवत नाहीत, तर या ऋतूमध्ये पसरणाऱ्या आजारांपासूनही आपले संरक्षण करतात.
हिवाळ्यातील खा हे सुपरफूड्स
रताळे- रताळे हे देखील मधुमेहासाठी आवश्यक कर्बोदकांपैकी एक आहे. एका रताळ्यामध्ये 4 ग्रॅम फायबर आणि व्हिटॅमिन सी असते. एंडोक्राइन जर्नलमधील एका अभ्यासानुसार, त्यात आढळणारे व्हिटॅमिन ए इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी सुधारते. यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन अँटीऑक्सिडंट फ्री रॅडिकल डॅमेज आणि इन्फ्लेमेटरी पासून संरक्षण देते.आले – आल्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म हिवाळ्यात पसरणाऱ्या विषाणूंपासून आपले संरक्षण करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आल्याचा उपयोग पचन, पोटदुखी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. याचे दाहक-विरोधी गुणधर्म ऍलर्जीवर उत्तम काम करतात.सफरचंद- सफरचंद हे व्हिटॅमिन-सीचा चांगला स्रोत आहे, जे हिवाळ्यात खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. यातील पेक्टिन हा पाण्यात विरघळणारा फायबर देखील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. सफरचंद त्याच्या सालीसह खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्याच्या सालीमध्येच जास्त फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात.भोपळा- थंडीच्या मोसमात भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी, बी 6 असते. हिवाळ्यात भोपळा खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लिंबूवर्गीय फळे- लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत मानली जातात. सर्दी किंवा फ्लूच्या हंगामात ते खाल्ल्याने खूप फायदा होतो. संत्री, द्राक्ष आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये असलेली खनिजे आणि फायटोकेमिकल्स देखील कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करतात.डाळिंब- डाळिंबात पॉलिफेनॉल मुबलक प्रमाणात असते. तज्ज्ञांचा असा दावा आहे की, आपल्या हृदयाचे आरोग्य आणि संसर्गाशी लढा देण्याबरोबरच ते स्मरणशक्तीही राखते. याशिवाय डाळिंब हे मधुमेहामध्येही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
ब्रोकोली- सफरचंदाप्रमाणेच ब्रोकोली देखील व्हिटॅमिन-सीचा उत्कृष्ट स्रोत मानली जाते. एक कप ब्रोकोली व्हिटॅमिन सी ची रोजची गरज भागवू शकते. यामध्ये कॅन्सरशी लढणारे पोषक तत्व देखील असतात. ब्रोकोलीसारख्या भाज्या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काम करतात, असा दावा अनेक अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे.बीट - बीटरूटला त्याच्या फायदेशीर घटकांमुळे सुपरफूड देखील म्हटले जाते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासोबतच स्नायूंची ताकद, स्मृतिभ्रंश आणि वजन कमी करण्यासाठी देखील हे चांगले मानले जाते. यामध्ये असलेले फोलेट, पोटॅशियम आणि बीटा कॅरोटीन शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.एवोकॅडो- एवोकॅडो ओमेगा-3, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी- व्हिटॅमिन-के घटक जसे की पॅन्टोथेनिक अॅसिड, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आढळतात. एका अभ्यासानुसार, एवोकॅडो वजन कमी करण्यासाठी आणि आतड्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.