top 10 foods to eat in winter season esakal
Winter Healthy Diet: हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचं असते. हिवाळ्यात (Winter)रोगप्रतिकारक (Immune System) शक्ती देखील कमकुवत असते, शिवाय तुमची पचन आणि चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे सकस आहार (Health) घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात काही रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.
1.मध | honey- हिवाळ्यात कोमट पाणी (warm water)आणि मधाने दिवसाची सुरुवात करा. खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एन्झाइम्सने मध समृद्ध असतो त्यामुळे तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते. कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय वजन कमी (weight loss) करण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.2.भिजवलेले बदाम | soaked almonds- रिकाम्या पोटी किंवा नाश्ता करताना भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन ई, फायबर, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडने समृद्ध भिजवलेले बदाम हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. बदाम हे असे पौष्टिक अन्न आहे, जे थोडे महाग असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी रोज ५ ते ६ बदाम रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात खा.
3.ओट्स | Oat- हिवाळ्यात शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी ओट्स खाणे फायदेशीर ठरते. ऋतू कोणताही असो, ओटमीलपेक्षा चांगला नाश्ता नाही. हे पोषक तत्वांनी भरलेले असते, ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहतेच पण दिवसभर ऊर्जाही मिळते. थंडीच्या मोसमात गरम ओट्स लगेच शिजवल्यास चवही चांगली लागते. विशेष म्हणजे ओट्समध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमचे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.
4. भिजवलेले अक्रोड | Walnuts- बदामाप्रमाणेच हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. भिजवलेले अक्रोड, भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, फायबर आणि कॅल्शियम, बीपी नियंत्रित करते आणि ते तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. तुमची चयापचय गती वाढवण्यासोबतच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेते. यासाठी रोज रात्री दोन ते तीन अक्रोड भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा.
5.कलिंगड | Watermelon- तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये फळांचा समावेश नक्कीच करू शकता. थंडीच्या मोसमात लोक अनेकदा कमी पाणी पितात, अशा परिस्थितीत तुम्ही कलिंगड खाऊन तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करू शकता. टरबूज इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते आणि त्यात उच्च पातळीचे लाइकोपीन देखील असते, जे हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते.
6.सुका मेवा | Dry fruits- जर तुम्ही नाश्ता breakfast करण्यापूर्वी मूठभर ड्रायफ्रुट्स खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यांचे सेवन केल्याने तुम्ही तुमचे पोट बरोबरच ठेवत नाही तर तुमची पचनक्रिया देखील सुधारते. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मनुके, बदाम आणि पिस्ते यांचा समावेश करू शकता. लक्षात ठेवा की ते जास्त प्रमाणात खाऊ नका, अन्यथा शरीरावर पुरळ उठू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.