दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशात अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. राजधानी क्विटोत २४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. यात ४२ जण जखमी झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाने घरांचे मोठे नुकसान झाले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की नैसर्गिक संकटामुळे प्रचंड हानी झाली आहे. क्विटो सुरक्षा विभागाच्या वतीने सांगण्यात आले, की ४२ लोक जखमी झाले आहेत. मदत पथकाने स्थानिक लोकांच्या माध्यमातून बचाव कार्य केले. मंगळवारी म्हणजे १ फेब्रूवारी रोजी अतिवृष्टी झाली. त्यामुळे वाहनांचा चिखला साचला होता. चिखलातून वाढ काढताना महिला.मदत पथक भूस्खलनाने मोठे नुकसान केले आहे.भूस्खलनग्रस्तांनी सांगितले की सोमवारच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीनंतर वाहने, मोटारसायकलसह इतर गाड्यांवर चिखलाचा थर साचला होता.सर्वात मोठे नैसर्गिक संकट असल्याचे सांगितले जात आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.