Election 2022: बॉलीवूड सेलिब्रेटींनी पाच राज्यांमधील विधानसभा (Bollywood Actress) निवडणूकांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली (Bollywood News) आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) , अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), उर्फी जावेद, प्रियंका चोप्रा या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्यापैकी कंगनानं जाहीर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तर इतर सेलिब्रेटींनी कुठल्या पक्षाचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे संबंधित पक्षाचे समर्थन केल्याचे दिसून आले आहे.
कंगना रनौत -
कंगनानं तर उघडपणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले आहे. कंगना ही भाजपची जोडली गेली आहे. हे तिच्या यापूर्वीच्या पोस्टवरुन दिसून आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघा़डीवर असून कंगनानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करण्यास सुरुवात केली आहे.
प्रियंका चोप्रा -
ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रानं देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तिनं रशिया आणि युक्रेन युद्धावर प्रतिक्रियाही दिली आहे. एकीकडे मतमोजणी सुरु असताना तिनं आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.
अनुपम खेर -
अनुपम खेर हे त्यांच्या ठाम राजकीय भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत. सोशल मीडियावर आपली राजकीय मतं प्रभावीपणे मांडणाऱ्या खेर यांचा द काश्मिर फाईल्स नावाचा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. तुम्ही आता मोहनलाल रैना यांना भेटणार आहात, काश्मिर पंडितांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं हे आता तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे. अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर या भाजपाशी संबंधित आहे.
उर्फी जावेद-
बॉलीवूड सेलिब्रेटी उर्फी जावेद ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिनं आजच्या निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं निकालावर पोस्ट शेयर केली नसून ट्रोलर्सला झापले आहे. ती म्हणते, मला या गोष्टीचे वाईट वाटते की, मी सध्या सोशल मीडियावर राजकीय कारणास्तव विभागले गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.