Afzal Khan Kabar Pratapgad esakal
आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.
सातारा : प्रतापगडावर (Pratapgad) असलेल्या अफजलखानाच्या कबरी (Afzal Khan Kabar Pratapgad) भोवतीची अतिक्रमणं हटवण्याचं काम आज पहाटेपासून सुरू करण्यात आलं असून, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त प्रतापगडावर तैनात करण्यात आला आहे.काल रात्रीपासूनच बाहेरील जिल्ह्यातील पोलीस (Police) बंदोबस्त मागवल्याची बातमी आल्यानं रात्री अफजलखान कबरीचं अतिक्रमण पाडणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं होतं. दरम्यान, महाबळेश्वर बाजारपेठेतून रात्री पोलीस गाडी फिरल्यामुळं अतिक्रमण प्रतापगडावरचं की, बाजारपेठेतलं याबाबत महाबळेश्वरकरांमध्ये चर्चा सुरू झाली होती.प्रतापगडावरील अफजल खान कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलनंही झाली.
न्यायालयीन खटले दाखल झाले आहेत. त्यामुळं या कबड्डीच्या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. दरम्यान, काल सायंकाळी परजिल्ह्यातून साताऱ्यात बंदोबस्त मागवल्यामुळं अफजलखान कबरीचं अतिक्रमण काढणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यामुळं हे खरं आहे का याबाबत विचारणा करणारे अनेक फोन जिल्ह्यात व परजिल्ह्यातून येत होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त वाईमध्ये बोलावण्यात आला होता. सुमारे अठराशे पोलीस काल रात्री दहा वाजेपर्यंत वाईत दाखल झाले होते. सर्व बंदोबस्तावरील पोलिसांची व्यवस्था एका मंगल कार्यालयात केली होती. पोलिसांचा सर्व फौजफाटा पाहता, त्यांनी रात्रीच प्रतापगडाकडं कूच केली आणि आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणं पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.