Kane Williamson Covid-19 Positive esakal
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून नॉटिंगहॅम इथं खेळवला जाणार आहे.
Kane Williamson Covid-19 Positive : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना (Test Match) आजपासून म्हणजेच, 10 जूनपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इथं खेळवला जाणार आहे.या सामन्यापूर्वी किवी संघासाठी एक वाईट बातमी समोर आलीय. कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आढळल्यानंतर, कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलाय.न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड (New Zealand coach Gary Steed) यांनी याला दुजोरा दिलाय. केन विल्यमसनच्या जागी हामिश रदरफोर्डचा संघात समावेश करण्यात आलाय. तर, विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम (Tom Latham) संघाचं नेतृत्व करणार आहे.दरम्यान, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं लॉर्ड्स कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर किवीज 0-1 नं पिछाडीवर आहेत. प्रशिक्षक पुढं म्हणाले, 'एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केन विल्यमसनला जबरदस्तीनं बाहेर पडणं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला माहित आहे, तो या क्षणी किती निराश असेल. पण, तो लवकर बरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. हामिश पहिल्या दौऱ्यात कसोटी संघासोबत परतणार आहे. सध्या तो व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्टमध्ये खेळत आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.