Engineers Day: 5 Bollywood Movies Every Aspiring Engineer Must Watch!  sakal
फोटोग्राफी

Engineers Day: हे ५ सिनेमे पाहिले नाहीत तर तुम्ही खरे इंजिनियर नाहीच!

आज अभियंता दिन, जाणून घ्या या खास सिनेमांविषयी..

नीलेश अडसूळ

Engineers Day: मनोरंजन विश्वात चित्रपट तयार करताना विविध विषयांना हात घातला जातो. आपल्याकडे अनेक चित्रपट हे खासकरून तरुणांना आकर्षित करण्यासाठी केले जातात, आणि जेव्हा तरुणांचा विषय येतो तेव्हा कॉलेज, कॉलेज लाईफ ही आलीच. त्यातही असे काही सिनेमे आहेत ज्यांचा थेट एंजिनियरिंगशी संबंध आहे. म्हणून आज एंजिनियर्स डे निमित्त जाऊन घेऊया असे कोणते पाच सिनेमे आहेत जे आपण प्रत्येकाने आणि सर्व इंजिनियर्सने पाहायलाच हवेत.. (Engineers Day: 5 Bollywood Movies Every Aspiring Engineer Must Watch!

)

3 इडियट्स: एंजिनियरिंगशी सर्वात जवळचा संबंध असलेला चित्रपट म्हणजे 3 इडियट्स. एंजिनियरिंगचे विद्यार्थी, तिथलं वातावरण, कॅम्पस येणारी आव्हाने या सगळ्याचा परामर्श घेणारा हा चित्रपट होता. अमीर खान, आर माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रत्येकाला वेड लावलं होतं.
उडान: उत्तम संहिता असलेला आणि समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट म्हणजे उडान. वास्तविक जीवनातील अनुभवांना पडद्यावर मांडणारा हा चित्रपट विशेष ठरला. इंजिनिअरिंगचे प्रस्थ इतके आहे की अनेकांना स्वतःच्या इच्छा बाजूला सारून केवळ दबावामुळे इंजिनियरिंग करावे लागते. अशा अनेक विद्यार्थ्यांना न्याय देणारा त्यांची बाजू मांडणारा विशेष म्हणजे तुम्हाला जे हवं ते तुम्ही बिनधास्त करा हे सांगणारा हा चित्रपट होता.
तमाशा : विद्यार्थी प्रशिक्षण घेतात, त्यांची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करतात, महाविद्यालयात प्रवेश घेतात, पदवी पूर्ण करतात आणि शेवटी नोकरी मिळवतात, तरीही त्यांच्या खऱ्या आनंदापासून दूर असतात. तमाशा हा चित्रपट अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पालकांच्या दबावाखाली अभियांत्रिकी पदवी मिळवावी लागते. सामाजिक आणि पालकांच्या दबावाला न जुमानता आपल्या स्वप्नाना आकार देणारा हा चित्रपट आहे.
साडा अड्डा: 'तुमची स्वप्ने पूर्ण करण्यापासून तुम्हाला रोखू शकणारी एकमेव गोष्ट ,म्हणजे तुम्ही स्वतः आहात' हे सांगणारा हा चित्रपट आहे. कॉलेज लाईफ, मैत्री, शिक्षण असे अनेक पैलू असलेला हा चित्रपट आहे.
लक्ष्य: अंगावर शहारे आणि प्रचंड प्रेरणा देणारा चित्रपट म्हणजे लक्ष्य. हा चित्रपट आपल्याला आयुष्यातील ध्येय कसं गाठायचं हे सांगतो. हृतिक रोशनने साकारलेल्या या चित्रपटाच्या नायकाप्रमाणे, बरेच विद्यार्थी त्यांच्या करिअरच्या निवडीबद्दल अनभिज्ञ असतात, मात्र, शेवटी आपले ध्येय ओळखून ते साध्य ककरण्याचा प्रवास यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT