जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनर असाल आणि तुमचा पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर हरवला असेल तर काळजी करू नका.
तुम्ही हे घरी बसून पुन्हा करू शकता. पीपीओ (PPO) नंबर हा ईपीएफओने कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर दिलेला युनिक नंबर आहे.पीपीओ (PPO) नंबरच्या मदतीने पेन्शनधारकांना रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळते. सर्वात आधी ईपीएफओच्या https://www.epfindia.gov.in/site_en/index.php या वेबसाइटवर लॉग इन करा.त्यानंतर नवीन पेजवर डाव्या बाजूला ‘Know Your PPO No.' या ऑप्शनवर क्लिक करा.
येथे पेन्शन फंडाशी जोडलेल्या बँक खात्याचा क्रमांक येथे टाका. तुम्ही पीएफ नंबर टाकून सर्च करू शकता, ज्याला मेंबर आयडी असेही म्हणतात. डिटेल्स सबमिट केल्यानंतर,पीपीएफ क्रमांक स्क्रीनवर दर्शविण्यास सुरवात होईल.
पीपीओ नंबर हा 12 अंकी नंबर आहे, तो एक रेफरन्स नंबर आहे. जो सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसला संवाद साधण्यासाठी असतो.पीपीओ नंबर पेन्शनर पासबुकमध्ये टाकणे आवश्यक आहे.पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर झाल्यावर पीपीओ क्रमांक महत्त्वाचा असतो.ऑनलाइन पेन्शनची स्थिती जाणून घेण्यासाठी पीपीओ नंबर देखील आवश्यक आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.