पुणे: काही मुलींना हाय हिल्स वापरायला खूप आवडते. बाजारातसुध्दा अनेक स्टाईलिश हाय हिल्स आले आहेत. तुम्हालाही हाय हिल्स घालायला आवडते का? कोणताही सण, कार्यक्रम किंवा कार्यालयात, तुम्ही मुख्यतः स्टाईल स्टेटमेंट करण्यासाठी आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी हाय हिल्स घालता, मग हे जाणून घ्या की ते हाय हिल्स घालणे तुमच्यासाठी किती धोकादायक असू शकते.
तुम्ही जितके जास्त स्टाइलिश हाय हिल्स घातलेले दिसता तितके ते तुमच्यासाठी हानिकारक असतात. हाय हिल्स घातल्याने शॉक एब्जॉर्विंग ची क्षमता कमी होते. याशिवाय हाय हिल्स घालून सरळ चालण्याने पाय हलवता येत नाही. यामुळे गुडघ्यांवर दबाव येतो आणि वेदना होतात.हाय हिल्स वापरल्याने तुमच्या मेंदूवर तसेच तुमच्या पायांवर परिणाम होऊ शकतो. खरं तर, हाय हिल्सच्या शेपमुळे, शिरामध्ये रक्ताचा प्रवाह संकुचित होतो आणि रक्ताभिसरण प्रभावित होते. डोकेदुखीची समस्या असणे खूप सामान्य आहे.आजकाल पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या महिलांमध्ये झपाट्याने पसरत आहे.याचे कारण हाय हिल्स असू शकते. वास्तविक, जेव्हा कोणी हाय हिल्स घालून फिरतात, तेव्हा त्याचे वजन योग्यरित्या बॅलन्स करत नाहीत, ज्यामुळे पाठीवर खूप दबाव येतो आणि यामुळे सतत पाठदुखीची तक्रार वाढते.हाय हिल्स घातल्याने पायांना सर्वात जास्त वेदना होतात.जर तुम्ही दररोज ऑफिस किंवा कॉलेजसाठी हाय हिल्स घालत असाल, तर नक्कीच तुमचे पाय आणि तळवा दुखू शकतात. हाय हिल्स घालून, तळव्यांच्या केवळ एका विशिष्ट भागाला संपूर्ण शरीराचे वजन सहन करावे लागते. हे बिघडलेले वजनाचे बॅलन्स केवळ पायांच्या तळव्यामध्ये असह्य वेदना होण्याचे कारण बनू शकते.या समस्या जाणून तुम्हाला हे समजले असेल की जर तुम्ही हाय हिल्स जास्त वेळ घालत असेल तर तुम्ही ते थोडे कमी घालावे.यासह, तुम्ही हाय हिल्सऐवजी कंफर्टेबल फुटवियर घालण्याची सवय लावली पाहिजे आणि प्रयत्न करा की आपण कोणत्याही स्पेशल ओकेजनवेळी हाय हिल्स घालू शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.