Famous Ravan Temple in India
हिंदू पंचागानुसार दिवाळीच्या बरोबर २० दिवस आधी अश्निन मास, शुक्ल पक्षात विजयादशमी/दसरा सण साजरा केला जातो. प्रभु श्री रामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता. या वर्षी १५ ऑक्टोबरला दसरा येणार असून त्याच दिवशी देशात ठिकठिकाणी रावण दहन केले जाते. असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी सण साजरा केला जातो मात्र, अन्याय आणि अधर्मचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रावणाची श्रीलंकेमध्ये आजही पूजा केली जाते. रावण हा लंकेचा राजा होता.
श्रीलंकेतील कोनसवरम मंदिर हे जगातील सर्वात प्रसिद्ध रावण मंदिरांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहितीये का, की भारतातही रावणाची मंदिरं आहेत जिथे त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी शंकराच्या मंदिरामध्येही रावणाला स्थान दिले आहे.बिसरख रावण मंदिर :
दिल्ली एनसीआर अंतर्गत येणाऱ्या ग्रेटर नोयडा क्षेत्रामध्ये बिसरख नावाचे गाव आहे. या गावाला रावणाचे जन्मठिकाण मानले जाते. या गावामध्ये रावणाचे मंदिर आहे, ज्यामध्ये ४२ फुट उंच शिवलिंग आणि ५.५ फुट उंच रावणाची मुर्ती आहे. येथे रावणाला 'महाब्रम्ह'चे स्थान असून दसऱ्याला 'महाब्रम्ह'साठी दुख व्यक्त करण्याची परंपरा आहे. बिरसख गावात रामलीलामध्ये रावण दहन केले जात नाही. येथील लोक दसरा साजरा करत नाही कारण त्यादिवशी प्रभु रामां यांनी रावणाचा वध केला होता. माहितीनुसार, उत्तरप्रदेशमध्ये गौतमबुध्द नगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. गावाचे नाव रावणाचे पिता विश्रवा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे असे म्हणतात. विश्रवा यांना जंगलात सापडलेल्या एक शिवलिंगाची स्थापना करून त्यानी मंदिर उभारले होते असे सांगितले जाते.रावण मंदिर जोधपूर, राजस्थान :
जोधपुरमध्ये राहणारे मुद्गल ब्राह्मणांना रावणाचे वंशज मानले जाते आणि त्यांना आपल्या राजासाठी एक भव्य मंदिराचा निर्माण केला आहे. मंदिराचा पाया रावणाच्या मूर्तींनी सुशोभित केलेला आहे आणि वर रावणाचे भव्य मंदिर बांधले आहे. जोधपूर शहर हे रावणाची पत्नी मंदोदरीचे मुळ गाव मानले जाते. मंदोदरी ही मंडोरमध्ये राहत होती जी जोधपूरची प्राचीन राजधानी होती असे मानले जाते. 'छवरी''नावाची छत्री अजूनही तिथे आहे. रावण मंदिर शहरातील चांदपोल भागात महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिरांच्या परिसरात आहे जिथे रावणाचे आराध्य दैवत शंकर आणि देवी खुराना यांच्याही मुर्त्या स्थापण केल्या आहेत. काकीनाडा रावण मंदिर, आंध्रप्रदेश :
काकीनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहऱ आहे आणि सोबतच एक आंध्र प्रदेशातील एकमेव ठिकाण आहे जिथे रावणाची पूजा केली जाते. रावणाच्या चित्रांना काकीनाडामध्ये
भव्य शिवलिंगाजवळ भगवान शंकरासोबत स्थापण केले आहे. काकीनाडा हे देशातील त्या निवडक ठिकाणांपैकी आहे जिथे रावणाची पूजा केली जाते. हे ठिकाण समुद्राच्या
किनाऱ्यापासून जवळ असून शहराच्या बरोबर मध्यभागी आहे. मंदिराच्या द्वारावर रावणची १० डोकी असलेली मोठी मुर्ती निर्माण केली आहे. हे ठिकाण अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे. मंदिरामध्ये भगवान शंकराची मुर्त्या आणि शिवलिंगाची स्थापना केली आहे. दशानन रावण मंदिर, कानपुर :
कानपुरमध्ये दशानन मंदिरामध्ये लोक रावणाची पूजा करतात. रावणाचे मंदिर शहरातील शिवाला परिसरात उभारेल्या शिव मंदिराच्या बाजुलाच उभारले आहे. हे मंदिर वर्षात फक्त एकच दिवस दसराच्या सणाला उलघडले जाते. जे लोक रावणाला उच्चशिक्षित मानतात ते मंदिराला भेट देतात आणि पूजा करतात. प्रभू श्रीराम स्वत: रावणाच्या ज्ञानाचा सन्मान करत असे. रावणाला सर्व हिंदुधर्मग्रंथाचे ज्ञान होते, असेही म्हटले जाते भाविक या मंदिराला भेट देवून रावणाला श्रध्दांजली अर्पित करतात. या मदिरांची पायाभरणी १८६८ मध्ये करण्यात आली होती. रावण रुंडी, मध्यप्रदेश :
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्हामध्ये रावणरुंडी आणि शाजापुर जिल्ह्यामध्ये देखील भदखेडी येथे रावणाची पूजा केली जाते. मदंसौर शहरामध्ये नामदेव वैष्णव समाजातील लोक दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करतात. रावणाची पत्नी या शहरातील होती असे ते मानतात. त्यामुळे रावणाला या शहाराचा जावाई मानले जाते आणि रावण दहन केले जात नाही. मंदसौर हे खानपूर भागात असून सन २००५ मध्ये ३५ फूट उंच, १० डोकी असलेली रावणाची मुर्ती स्थापण केली होती. त्याआधी रावणाची चुना आणि विटेपासून बनवलेली २५ फुटी उंच मुर्ती स्थापण केली होती जी १९८२ पर्यंत उपलब्ध होती. पण वीज पडल्यामुळे या मुर्तीला तडा गेला आणि ती मुर्ती नष्ट झाली. दसऱ्याला दरवर्षी या भव्य मुर्तीची पूजा केली जाते. या परिसरात महिला दसऱ्यादिवशी पदर घेऊन चेहरा झाकतात कारण त्या रावणाला जावाई मानतात आणि जावयासमोर महिला पदराच्या आडच राहण्याची येथे परंपरा आहे. पुरुष आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी रावणाच्या पुजेदरम्यान कित्येक धार्मिक कार्य करतात. यावेळी रावणासह त्याचा मुलगा मेघनाद याचीही पूजा केली जाते.बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश :
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा मुख्यालयपासून जवळपास ६० किमी दू बैजनाथ शहर आहे. येथील रहिवाशी मानतात की, दसरा साजरा करून भगवान शंकरासाठी असलेल्या रावणाच्या भक्तीचा सन्मान करतात.
बैजनाथ(४३११फुट) हिमालयातील सुंदर धौलाधार पर्वतांच्या रांगामध्ये वसलेलं छोटं शहर आहे. हे भगवान शंकराचे मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जे १३ व्या शतकामध्ये उभारले होते. पौराणिक कथांनुसार, रावण ब्रम्हांडाचे निर्माते भगवान ब्रम्हाचे पुत्र आणि ऋषि विश्रवााचे पुत्र तसेच संपत्तीचा देवता कुबेरचे छोटे भाऊ असे म्हणतात. येथील लोकांचे म्हणणे आहे की, रावण एक विद्वान, कलेचा उपासक आणि भगवान शंकाराचे खास भक्त होता. रावणला विद्वान मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. त्याची पूजा करणारे लोक ज्याला सर्व वेदांचे ज्ञान होते, भगवान शंकाराचे भक्त होते त्या विद्वान राजाचे दहन करणे योग्य समजत नाहीब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.