Famous Temples in Maharashtra Esakal
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरं (Famous Temples in Maharashtra):
महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलाय. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत, जिथे भाविक भक्तीभावाने जात असतात. त्यांपैकी काही मंदिरांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
1. सिद्धीविनायक मंदिर (Siddhivinayak Temple, Mumbai)- मुंबईमधील सिद्धीविनायक मंदिर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. या मंदिरात श्रीगणेशाची अतिशय आकर्षक मुर्ती आहे. 2. मोरेश्वर मंदिर (Moreshwar Temple, Morgaon)- महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असं हे मोरेश्वर मंदिर पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे आहे. 3. कैलास मंदिर (Kailas Temple, Aurangabad)- औरंगाबादमधील कैलास मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर असून ते पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील लोक येत असतात.हे मंदिर एलोरा गुहांमध्ये असून ते बांधण्यासाठी 18 वर्षांचा कालावधी लागला होता. 4. त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple, Nashik) - नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे प्रसिद्द शिवमंदिर आहे. 5. यमाई मंदिर (Yamai Temple, Satara) - सातारा जिल्ह्यातील औंध येथील यमाई मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. एका डोंगरावर वसलेलं हे सुंदर मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 6. भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple)- 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर मंदिर प्रसिद्ध आहे.
7. गणेश मंदिर, गणपतीपुळे (Ganesh Temple, Ganpati Song)-समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं गणपतीपुळे येथील गणेश मंदिर पाहण्यासाठी लाखो भाविक येत असतात. श्रीगणेशाच्या मंदिरासोबतच येथे समुद्रकिनारी फिरण्याची मजाही घेता येते.
8. याशिवायही महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. त्यांचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.