फॅशनच्या (Fashion) नावाखाली स्लिम मुली (Slim girls) दाखवल्या जातात. अशा परिस्थितीत फॅट आणि प्लस साइजच्या (Plus size) महिला स्टाइलच्या बाबतीत मागे राहतात. पण जर तुम्ही कर्वी फिगरचे असाल आणि तुम्हाला स्टायलिश (Stylish) दिसायचे असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जाड स्त्रिया देखील स्टायलिश आणि ट्रेंडी कपडे घालू शकतात. फक्त थोडे लक्ष देण्याची गरज आहे. अशावेळी तु्म्ही विद्या बालनकडून (Vidya Balan) प्रेरणा (Inspiration) घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया साडीसोबतच (Saree) वेस्टर्न ड्रेसमध्येही (Western dress) स्टाइल कशी करावी.
जर तुम्ही कर्व्ही फिगर (Curvy figure) आणि प्लस साइज महिला असाल तर विद्या बालनला पाहून तुम्ही स्टाइल टिप्स घेऊ शकता. सध्या विद्या सोशल मीडियावर (Social media) तिच्या सुंदर लूक असलेले फोटो शेअर करत आहे. ज्यामध्ये तिचा लुक जबरदस्त दिसतोय.जर तुम्हाला वेस्टर्न घालण्याची आवड असेल तर तुम्ही डेनिम लूक देखील ट्राय करू शकता. डेनिम ब्लू शर्टसोबत मॅचिंग जीन्ससोबत वापरु शकतात. तसेच, चंकी इअररिंगसह हा लुक पूर्ण करा.ओव्हरसाईज शर्टसोबत प्रिंट स्कर्टमध्ये विद्या बालन खूपच सुंदर दिसतेय. त्याचबरोबर विद्याने हा लूक बोहो लुक बेल्टसोबत पेअर केला आहे. त्याचबरोबर, मध्यभागी असलेली हेअरस्टाईल तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. प्लस साइजच्या महिला ही ड्रेसिंग सहज करू शकतात.
जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही कॉटन किंवा सिल्कच्या साडीतही सुंदर दिसाल. फक्त ते वापरताना ते मोनोक्रोम असावेत हे लक्षात ठेवा. सिंगल कलरची साडी तुम्हाला स्लिम दिसण्यास मदत करेल. ब्रॉड वेस्ट मुलींनी प्लाझो पँट किंवा फ्लेर्ड पँट वापरून पहावी. शॉर्ट कुर्ती किंवा लाँग शर्टसोबत ट्राय करा. त्याचबरोबर हा लूक स्लिम करण्यासाठी मोनोक्रोम लुक जरुर करा. विद्या बालनचा हा आउटफिट परफेक्ट आहे.
जर तुम्हाला एथनिक लुक ट्राय करायचा असेल तर स्कर्ट आणि क्रॉप टॉपसह लॉंग श्रग किंवा जॅकेट घाला. हे तुम्हाला स्लिम दिसण्यास मदत करेल. दुसरीकडे, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मल्टीकलर प्रिंटच्या लाँग ड्रेससोबत लाँग ब्लेझरही ट्राय करू शकता. तुम्हाला ट्रेंडी लुक देण्यासोबतच थंडीच्या मोसमात स्टायलिश लुकही देईल. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.