Fathers day 2022 news esakal
Father's Day 2022: टॉलीवूड गेल्या काही महिन्यांपासून फारच प्रभावित करताना दिसत आहे. वास्तविक गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पुष्पानं प्रेक्षकांना वेडं लावलं होतं. त्यानंतर आता एकापाठोपाठ एक अशा जबरदस्त कलाकृती प्रेक्षकांचे लक्ष (Tollywood movies) वेधून घेताना दिसत आहे. आज फादर्स डे निमित्तानं आपण टॉलीवूडमधील बाप लेक अन् बाप लेकींचं नातं जाणून घेणार आहोत. बॉलीवूडमध्ये सकाळपासून (tollywood news) अनेक सेलिब्रेटींनी फादर्स डे च्यानिमित्तानं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. टॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या बाप पणाची चर्चा नेटकऱ्यांना भावली आहे.
आरआरआरमधून बॉलीवूडच्या प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर. त्याची पत्नी लक्ष्मी प्रणीती आणि तो त्यांच्या दोन्ही मुलांना बराचसा वेळ देतात. त्यांच्याशी संवाद साधतात. अभय राम आणि भार्गव राम अशी त्यांची नावं आहेत. टॉलीवूडमधील आणखी एक सुपरस्टार म्हणजे नानी. नानी आणि अंजनाला अर्जुन नावाचा मुलगा आहे. नानीनं सोशल मीडियावर त्याचे वेगवेगळे फोटो शेयर केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूनं आपण काहीही झालं तरी बॉलीवूडमध्ये काम करणार नाही. अशाप्रकारचे एक विधान केले होते. त्यावरुन तो वादात सापडला होता. महेशनं अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. महेशचं त्याच्या लेकीशी सिताराशी खास बाँडिंग आहे. मुलांसोबत मित्रासारखे राहणे आणि वागणे त्याला आवडते. मेगास्टार चिरंजीवी हे सुपरस्टार रामचरण यांचे वडिल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यापूर्वी देखील त्यांचे एकत्रित भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित झाले होते. स्टारडम असताना देखील चिरंजीवी हे नेहमीच साधेपणानं आपलं आयुष्य व्यतीत करणारे सेलिब्रेटी आहेत.
अल्लु अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांना दोन मुलं आहेत. मुलीचं नाव अरहा तर मुलाचं अयान. प्रोफेशल लाईफमध्ये प्रचंड बिझी असणाऱ्या अल्लु अर्जुननं खास वेळ काढून मुलांशी संवाद सुरु ठेवला आहे. सोशल मीडियावर त्यानं व्हायरल केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओतून ते दिसून आले आहे. केवळ जबदस्त अभिनेता नव्हे तर एक कर्तव्यदक्ष बाप म्हणून अल्लु अर्जुन हा नेहमीच चर्चेत असतो. (Allu Arjun And Sneha Reddy) सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.