selfie with father esakal
असं म्हणतात की देवाला स्वतः ला सगळीकडे जाणं शक्य नव्हते म्हणून त्याने आईची निर्मिती केली,आणि हे ही तितकेच खरे आहे की,देवाला स्वतः ला सर्वांचे पालन पोषण करणे,सर्वांचे संरक्षण करणे शक्य नव्हते म्हणून त्याने "पित्याची" निर्मिती केली. आज पितृदिनाच्या निमित्ताने #selfiewithfather या हॅशटॅगच्या माध्यमातून वडिल आणि मुलांचे अनुभव शेअर करणार आहोत.
भीमराव चव्हाण आपल्या दोन लेकींसोबत -
बाप हाच देव..मायेचा सागर.. प्रेमाचे आगर.. पकडले बोट.. तात माझा गुरू..आयुष्य हे सुरू.. बापामुळे... सृष्टी आणि निर्मिका या दोन्ही लेकी किती नशिबवान आहेत. ज्यांना उत्तम शिक्षण देऊन एक माणूस म्हणून घडविण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा बाप मिळाला आहे. आजच्या काळात मुली-मुलांमध्ये भेदभाव न करता मुलींना सुध्दा तितकाच पाठिंबा मिळाला पाहिजे असे भीमरीव चव्हाण या निमित्ताने सर्वांना सांगतातनिलेश छाजेड लेक नुपूर छाजेड सोबत -
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही. असे नुपूर आवर्जून सांगतेसोमनाथ कोकरे लेक काजल वावरे सह -
'माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला.' असं म्हणतात की देवाला स्वतः ला सगळीकडे जाणं शक्य नव्हते म्हणून त्याने आईची निर्मिती केली,आणि हे ही तितकेच खरे आहे की,देवाला स्वतः ला सर्वांचे पालन पोषण करणे,सर्वांचे संरक्षण करणे शक्य नव्हते म्हणून त्याने "पित्याची" निर्मिती केली असे आपल्या वडिलांबाबत सांगताना लेक काजलचा ऊर भरून आला होता. संतोष सुर्यवंशी लेक मनस्वी सोबत -
पिता संतोष सुर्यवंशी आपल्या अनुभवाविषयी सांगतात... 22 जानेवारी 2020 ला मुलीचा जन्म झाला. त्यानंतर लगेच साधारणतः मार्चमध्ये भारतात कोरोनाचे संकट आले त्यावेळी हा आजार नवीन असल्याने साहजिकच मनात खुप भिती होती, त्यात घरात दोन अडीच महिन्याचे मुल म्हटल की अधिकच काळजी घ्यावी लागत होती, एवढी काळजी घेऊनही अखेर पहिल्या लाटेत सप्टेंबरमध्ये कार्यालायतील पहिला कोरोनाबाधित निघालो, मी बाधित असल्याचे समजताच पहिला विचार आला तो मुलीचा. माझ्यामुले तिला तर काही झाले नसणार ना? शेवटी तीचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला पण सुदैवाने कुठलेही लक्षण नसताना व औषधी न घेता ती बरी झाली, हा कालखंड खुप तणावाचा होता. ब्रीजकुमार परिहार मुलगा तन्मय आणि लेक समीक्षा सोबत-
खरं तर आदरयुक्त दरारा , प्रेमळ धाक ,शिस्त या गोष्टी वडीलांच्या बाबतीत अनुभवायला मिळतात. वडिल म्हणजे खुप कडक,सतत रागावणारे,कायम धाकात ठेवणारे असं चित्र फार पूर्वी होते (मोठ्यंकडून बरेचदा ऐकलेले आहे)पण आताचे वडिल म्हणजे एकदम शांत, संयमी,आजच्या भाषेत बोलायचे झाले तर एकदम कुल ,मुलांबरोबर मैत्री करणारे,त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे,त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे असे आमचे बाबा आमच्यासाठी आदर्श आहेत असे दोघा मुलांनी वडिलांविषयी सांगितले. मनीष कुलकर्णी मुलगा स्वरोम कुलकर्णी सोबत -
डोळ्यात न दाखवताही जो
आभाळा एवढं प्रेम करतो
त्याला वडील नावाचा
राजा माणूस बोलतात. आता या बाप-लेकाचा सेल्फी पाहा ना...त्यांच्या डोळ्यात एकमेकांविषयी किती प्रेम आहे. प्रशांत कोतकर मुलगा अमेय, मुलगी खुशी सोबत
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा! प्रत्येक पिढीतल्या बाबांना आपल्या मुलांचे चांगले व्हावे, त्यांना आयुष्यात कुठल्याच दुःखाचा सामना करायला लागू नये असेच वाटत असते. पण ते व्यक्त करण्याची त्यांची पद्धत पिढी नुसार बदलत गेली. एक गोष्ट मात्र नक्की की कितीही पिढ्या बदलल्या तरी प्रत्येक मुलासाठी त्याचे बाबा हे सगळ्यात strong, सगळ्यात बेस्ट आणि बाबा सुपरहिरोच राहणार.रावसाहेब उगले त्यांच्या मुलांसोबत
वडिल, बाप, पिता, तात किती साधे शब्द,पण केवढा अर्थ दडलाय त्यात. वडिल म्हटल की वटवृक्ष तो न डगमगता इतरांना सावली देणारा अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते.अस्लम मगदुम मुलगा इर्शादहुसेन सोबत
माझे बाबा ज्यांना आम्ही 'अब्बाजी' म्हणून संबोधतो. खरं तर माझे बाबा शेतकरी व्यक्तिमत्त्वाचे, परिस्थितीमुळे अत्यंत हुशार असूनही उच्च शिक्षणाची अपेक्षा असतानाही वंचित राहावे लागले. पण आम्हा तिन भावंडांना शिकवण्याची जिद्द होती. अशा सामान्य परिस्थितीतही त्यांनी मला मॅकेनिकल इंजिनीरिंगमध्ये शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले. मोठ्या दोन्ही बहिणींना MSC mathematics चे शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे केले. संसार सांभाळताना कितीही अडचणी आल्या तरी "अब्बाजींनी" आम्हा मुलांना त्याची जाणीव कधीच होऊ दिली नाही. सुपरहिरो मुव्हीजमध्ये जसं एखादा सुपरहिरो काल्पनिक संकटाचा सामना करतो. असे ईशादहुसेन न विसरता सांगतो.विजय कराळे लेक सायली सोबत
बाबांविषयी सायली सांगते, कुठून सुरुवात करू? काय लिहू? किती लिहू? या चार - आठ ओळींमध्ये व्यक्त करण्यासारखे बाबांचे व्यक्तिमत्त्व नाही. बाप-लेकीचं नातं कधीही न संपणार अतूट, एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. वडिलांवर एखादं गाणं असो, कविता असो वा चारोळ्या त्या ऐकताच क्षणात डोळ्यांत पाणी येते. माझ्या बाबांविषयी लिहावं तितकं कमीच. माझे बाबा दिसायला सुंदर, रुबाबदार, प्रत्येक बाबतीत खंबीर असणारे, थोडे रागीट पण त्यांचा राग हा आळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखा, मनमिळावू, जीवाला जीव देणारे. एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून नेहमी ते माझ्यासाठी आयडॉल आहेत. दत्तात्रय चव्हाण लेक स्वाती सोबत
एकदम साधी राहणी तुमची. जेव्हा वाढदिवसाला मी माझ्या पहिल्या कमाईतून घड्याळ घेतलं तेव्हा बोलला होतात, इतकं महाग कशाला घेतलं?? पण तेव्हा तुमच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं होतं. तुम्ही आजारी पडलात तो काळ सर्वांसाठीचं कठीण होता. 3 महिने हॉस्पिटलमध्ये होतात. तुम्हाला त्या अवस्थेत पाहिलं की अंगातला त्राण निघून जायचा. कारण कधीच या अशा परिस्थितीत पाहिलं नव्हत. यातून तुम्ही सुखरुप बाहेर पडलात आणि खूप भावनिक झालात. एक किस्सा आठवतोय माझ्या लग्नादिवशीचा, तुम्ही भावनिक होऊन त्या दिवशी खूप रडलात. जेव्हा भेटायला आले तेव्हा मिठीत घेऊन, 'करमत नाही गं, तुझ्याशिवाय!' इतकचं बोललात. मी माघारी वळून पाहिलं तर डोळे पुसत होतात. मी ते पाहिलं होतं. अख्ख्या कुटुंबाचा मोठा आधार असलेला माझा बाबा त्यादिवशी हळवा झाला होता. स्वातीने अनुभव सांगितला.जितेंद्र केंबळे सोबत मुलगा प्रज्वल
माझ्या आई बाबांचा मी एकलुता एक लाडका मुलगा. सुरुवातीपासून भावंडात वाटणी घालणे हा प्रकार कधी नाहीच. कोणती गोष्ट मागितली आणि ती काही क्षणात पूर्ण नाही झाली असा कोणताच प्रसंग आठवत नाही. माझ्या आईबाबांचा नाईंटिजचा प्रेमविवाह. सुरुवातापासून घरचं वातावरण अगदी बिनधास्त. मैत्रिच, आपुलकीचं आणि कोणत्याही बंधनाशिवायचं. कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ माझ्यासाठी खुप माहितीचा आणि नवं काही शिकण्यासाठी पोषक ठरला. या कालावधीत बाबांसोबत बऱ्याच नव्या गोष्टी मी आत्मसात केल्या. माझे बाबा एक उत्तम फोटोग्राफर आहेत. सुदैवाने मी ही त्यातील बारकावे खुप कमी वेळात शकलो आहे. आउटडोर, इनडोअर फोटोग्राफीसाठी त्यांनी मला मार्गदर्शन तर केलेचं शिवाय प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. कधी काही चुकलं तर शब्दांचा मार खूप असतो. त्यामुळे एकदा झालेली चुक सहसा परत होत नाही. माणसं जोडणं आणि ती जपणं त्यांना परफेक्ट जमतं. त्यांचा हा गुण माझ्याकडेही यावा इतकचं नेहमी मला वाटतं राहतं. ते इतक्यात होईल की नाही माहित नाही. पण बाबांना विचारलं की एकच सांगतात. जमेल तुलाही सारं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.