Dia Mirza Fitness Tips Sakal
सुप्रसिद्ध बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये काम करताना दिसत नाही, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली असते. दिया मिर्झाने स्वतःला इतके फिट ठेवलं आहे की, तिच्याकडं पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे तसं कठीण जातं. वयाच्या 39 व्या वर्षी दिया आई झाली. मुलगा अव्यानच्या जन्मानंतरही तिने स्वतःला फिट ठेवले. दिया मिर्झाच्या फिटनेसचं (Fitness) रहस्य काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Dia Mirza Fitness Secret)
1. योग्य आहार (Diet)- दिया मिर्झा आहाराच्या बाबतीत खूपच जागरूक असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती फळे आणि हिरव्या पालेभाज्या खायला प्राधान्य देते. ती सकाळी दूध पिते आणि डाळींब खाते. 2. जंकफूडपासून राहते दूर- दिया मिर्झा जंकफूड आणि तेलकट पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवते. ती घरच्या जेवणाला प्राधान्य देते. दुपारच्या जेवण ती पोटभर करते. तर रात्रीच्या जेवणात ती उकडलेल्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये तसेच एवोकाडो खाते.3. दिया मिर्झाला डांस, घोडेस्वारी, कबड्डी, पोहणे, बास्केटबॉल खेळायला आवडते. यामाध्यमातून ती स्वतःला फिट ठेवते. 4. वर्कआऊट- दिया मिर्झा रोज ट्रेडमिलवर रनिंग करते. याशिवाय ती स्ट्रेचिंग, क्रॉस-फिट आणि वेट ट्रेनिंग, पिलेट्स करते. व्यायामाशिवाय ती योगापण करते.
5. दिया रोज साधारणपणे 10 हजार पावले चालते. तिला झाडे असलेल्या ठिकाणी फिरायला आवडते. 6. ज्यूस- दिया मिर्झा आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी ताज्या फळांचे ज्यूस पिते. बाजारातील इतर ड्रिंक पिणे ती टाळते. 7. आपल्या दिवसाची सुरुवात दिया कोमट लिंबू पाणी पिऊन करते. याशिवाय ती स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी सुमारे 8-10 ग्लास पाणी पिते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.