ब्रेकफास्ट हे दिवसातील सर्वात महत्त्वाचे अन्न मानले जाते. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये काय खाता यावर तुम्ही दिवसभर काय खावे हे निवडू शकता. उरलेल्या दिवसामध्ये हेल्दी डाएटमुळे तुमच्या आरोग्यावर खूप फरक पडतो पण तो एखादा पदार्थ कमी -जास्त करून भरून काढता येतो. वजन कमी करण्याचे योग्य पध्दत म्हणजे, हेल्दी फुड, व्यायाम, जो नियमीत पाळला पाहिजे जेणेकरून तुम्हाला समाधानकारण आणि दिर्घकाळ टिकणारे रिझल्ट दिसेल. आपण जर विशेषकरुन पोटावर लक्ष केंद्रीत करत असाल, तर वजन कमी करण्याच्या तंत्रानुसार पोटावरील चरबी कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही हे ब्रेकफास्टचे पर्याय ट्राय करू शकता.
उपमा
उपम्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, हेल्दीपध्दतीने वजन कमी करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. त्यात रवा देखील असतो ज्यामध्ये नैसर्गिकरित्या कमी फॅट असते आणि चांगले कोलेस्टेरॉल, चांगले फॅटस् टिकवून ठेवण्यास टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, ते कमी तेलात शिजवले पाहिजे जेणेकरुन जास्त चरबीमुळे पौष्टिक फायदे नष्ट होणार नाहीत.अंडे Eggs
अत्यावश्यक न्युट्रिशन्स आणि कार्ब किंवा फॅटचे प्रमाण कमी असल्याने, अंडी हा ब्रेकफास्टसाठी योग्य पर्याय आहे. त्यांना स्क्रॅम्बल, पोच करून किंवा भाज्यांसोबत ऑम्लेट म्हणून खाण्याची शिफारस केली जाते कारण तो कमी फॅटस् असलेला ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्टचा पर्याय कितीही आरोग्यदायी असला तरी कॅलरीजचे नियमन योग्यरित्या केले पाहिजे हे लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे.लापशी Porridge
कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कार्बोहायड्रेट, ओट्स बहुमुल्य आहेत आणि पॉवर-पॅक, हेल्दी ब्रेकफास्टसाठी दुधासह एकत्र खाता येऊ शकतात. रात्रभर थंड झाल्यावर ते दही किंवा थंड दुधासह देखील सेवन केले जाऊ शकते आणि आपल्या आवडीची फळे घातल्यास आपल्याला हव्या त्या चव वाढू शकतात. गोडपणासाठी साखरेऐवजी मध हा चांगला पर्याय आहे. दही किंवा रात्रभर थंड केलेले दुधासोबत आणि तुमच्या आवडीनुसार फळांचाही त्यात समावेश करू शकता. गोडपणासाठी तुम्ही त्यामध्ये साखरेऐवजी मध वापरू शकता.
मुगडाळ चिला Moong Dal Chilla -
मुगडाळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. तसेच डायजेस्टीव्ह फायबर, पुरेश्या प्रमाणात प्रोटीन्स देखील असतात त्यामुळे वजन कमी करताना ब्रेकफास्टसाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही त्या मिश्रणामध्ये भाज्या देखील वापरू शकता जेणेकरुन तुमचा ब्रेकफास्ट आणखी हेल्दी आणि न्युट्रीशन्सने भरपूर होईल.दही - Yogurt
संशोधनातून समोर आले की, दह्याचा आहारात समावेश न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जे लोक दह्याचे सेवन अधिक प्रमाणात केले त्यांचे वजन अधिक कमी झाले आणि मांसपेशीय वस्तुमान(lean muscle mass)नियंत्रित करते. हे निरिक्षणानुसार, वजन कमी करताना न्यट्रीशन्स आणि कॅल्शिअम हे महत्त्वाचे ठरतात.
आहारातील कॅल्शियमचे योग्य प्रमाण मांसपेशींवर परिणाम करत नाही, शरीरातील कॅलरी बर्न करण्यास आणि चरबी कमी करतात, फायदेशीर ठरतात. दहीमधून भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात जे बॉडी फॅटमधील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, हे लक्षात घेतले पाहिजे की फळांच्या दहीमध्ये खूप जास्त साखर असते आणि ग्रीक योगर्टसारखे आरोग्यदायी पर्याय खावेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.