Five tech gadgets that every woman must have esakal
तुम्हाला स्वत:साठी काही खरेदी करायचं. तसेच तुमच्या जवळच्या मैत्रीणी, बहिणीला किंवा ऑफिसला कलिगला गिफ्ट द्यायचं असेल तर या लिस्टमध्ये प्रत्येक स्त्रीकडे असायला हवी अशी काही गॅजेट्स आहेत. चला ते पाहूयात.
फिटनेस ट्रॅकर (FITNESS TRACKER)-
आजकाल प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी घेतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याला फिटनेस बँड किंवा ट्रॅकर भेट म्हणून दिलात, तर ती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त भेट ठरेल. यावरून तुम्हाला त्यांची किती काळजी आहे याची कल्पना येईल.जीपीएस ट्रॅकर/टाइल ट्रॅकर (GPS TRACKER/TILE TRACKER)-
आपल्यापैकी बरेचजण कुठेतरी वस्तू ठेवण्यास विसरतात आणि ते संपूर्ण घरात शोधतात. विशेषत: चाव्या ठेवणे आणि इतर छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जातात. अशा परिस्थितीत टाइल ट्रॅकर गिफ्ट करून तुम्ही त्यांची समस्या दुर करू शकता. खरं तर, टाइल ट्रॅकर हे एक लहान डिव्हाइस आहे जे ते बॅग, पर्स किंवा कीच्या वर ठेवू शकते आणि मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे त्याचे स्थान ट्रॅक करू शकते.
हेअर ड्रायर (HAIRDRYER)-
अनेक स्त्रियांसाठी हेअर ड्रायर हे केवळ गॅजेट नसतं, तर ती गरज असते. विशेषत: ज्या स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी काम करतात. वेळेअभावी त्यांना केस सुकवायला वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही पॉवरफूल हेअर ड्रायर गिफ्ट म्हणून देऊ शकता. फ्रेम (FRAME)-
पूर्वी अनेकदा लोक एखाद्या प्रसंगी फोटो फ्रेम भेट म्हणून देत असत. पण आता काळ बदलला आहे. गिफ्ट म्हणून तुम्ही एखाद्या महिलेला व्हिडिओ फ्रेम गिफ्ट करू शकता. या व्हिडिओ फ्रेममध्ये तुम्ही खास असलेल्या क्षणांचे फोटो लावू शकता. व्हिडिओ फ्रेममध्ये फोटो सतत फिरत असतो. हे ऑफिसमध्ये किंवा घरी लावू शकता.
रूम ह्युमिडिफायर (ROOM HUMIDIFIER)-
महिला आणि मुलींसाठी त्यांची स्कीन खूप खास असते, हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. चेहरा उजळण्यासाठी महिला स्किनकेअरच्या खास रूटीनकडे जास्त लक्ष देतात. ह्युमिडिफायर त्वचेला पुरेशा प्रमाणात ओलावा देऊन त्याचे पोषण करण्यास देखील मदत करते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.