new year party at home 
फोटोग्राफी

नववर्षाची पार्टी घरीच कशी सेलिब्रेट कराल? पाच प्रकार जाणून घ्या

गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

३१ डिसेंबरला यावर्षी पार्टीसाठी लोकांची गर्दी होणार हे गृहीतच आहे. पण, गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या कोरोनाचे रूग्ण सगळीकडे वाढत आहेत. ऑमिक्रोनचा प्रभाव वाढल्याने रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने (Goverment) बरेच निर्बंध पुन्हा लावायला सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबरला (New Year Party) यावर्षी पार्टीसाठी लोकांची गर्दी होणार हे गृहीतच आहे. पण, गर्दी टाळण्यासाठी पर्यायाने संसर्गापासून वाचण्यासाठी लोकांनी घरीच नवीन वर्ष साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाची भितीही राहणार नाही आणि पार्टी केल्याचे समाधानही मिळेल. त्यासाठी या पाच टिप्स फॉलो करा.

कराओके नाईटचा विचार करा (Host a Karaoke Night) - मित्र-मैत्रीणी, जवळचे नातेवाईक यांच्यासोबत घरी एक कराओके पार्टी आयोजिक करा. यासाठी तुम्हाला फक्त माईक लागणार आहे. युट्यूबवर (YouTube ) अनेक कराओके गाण्याचे व्हिडिओ सहज मिळतील. ते तुम्ही वापरून तुमची आवडती गाणी गाऊ शकता. तुम्ही जुन्या गाण्यांचा आनंदही याद्वारे घेऊ शकता. घरी पार्टी प्लॅन करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
डान्स पार्टी (Dance Party)- मित्र किंवा कुटूंबासोबत अशी डान्स पार्टी आयोजित करता. म्युझिक लावून तुम्ही मस्त डान्स करू शकता. केल्याने पार्टीची मजा तर वाढतेच पण एनर्जीही दुप्पट होते. मात्र असे करताना शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. डान्स केल्याने तुम्ही तणावापासून मुक्त रहाल आणि नव्या उत्साहाने नवीन वर्षासाठी तयार असाल.
लक्षात राहतील असे फोटो काढा (A Photo Session To Remember)- पार्टीसाठी मस्त कपडे घालून तयार राहा. मित्र, कुटुंबासह मजा करताना लक्षात राहतील असे एकसोएक फोटो काढा, पार्टीसाठी तुम्ही तुमचे घर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवू शकता.मेणबत्या लावू शकता. अशा जागी फोटो छान येतात. तेव्हा मनसोक्त फोटो काढून ते इंस्टाग्रामवर शेअर करू शकता.
गेम्स खेळा (Play Games) चॅरेड्स, मॉनोपोली आणि पत्ते यासारखे गेम्स तुम्हाला सर्वांना एकत्र खेळता येतील. काही गेम्स तुम्ही ऑनलाइनही खेळू शकता, गेम आणि भरपूर गप्पा मारत तुमचा तो काळ आठवणीत राहील, असे आयोजन करा.
फूड पार्टी - डिनर पार्टी :- तुम्ही घरी कँडल लाईट डिनर प्लॅन करू शकता. यासाठी तुम्ही वर्षाच्या तुमचे आवडते पदार्थ तयार करू शकता. जर तुम्ही विविध पेये, स्टार्टर, मेन कॉर्स, डेझर्ट असे प्रकार ठेवून पार्टीचा आनंद द्विगुणीत करू शकता. किंवा तुमच्याबरोबर जे पार्टीत सहभागी होणार आहेत. त्यांना एकेक पदार्थ आणायला सांगून पदार्थांमध्ये व्हरायटी ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT