नाश्ता, लंच, डिनर काहीही असो.. या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपल्या अन्नाची शान वाढवतात व आपल्याला एक वेगळाच आनंद देतात.
शेंगदाणा चटणी : भारतात ही चटणी सर्वच घरांत उपलब्ध असते. प्रत्येक खाद्यपदार्थासोबत खाण्यासाठी या चटणीचा वापर केला जातो. इडली, डोसाबरोबरही याची चव वेगळीच असते. तुम्ही ही चटणी 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवून देखील खाऊ शकता.शेजवान चटणी : या चटणीला बाजारात मोठी मागणी असते, परंतु घरी देखील विविध प्रकारचा मसाला वापरुन ही चटणी सहजरित्या बनवू शकता व याचा आस्वाद घेऊ शकता.नारळ-कोथिंबीर चटणी : नारळ-कोथिंबीर चटणी ही लसणाचा तडका देऊन घरीच बनविली जाते. ही चवदार चटणी डोसा, पोहे, रवा डोसा आणि म्हैसूर मसाला डोस्यासोबत शेअर करु शकता.अननस चटणी (Pineapple chutney) : आंब्याप्रमाणेच अननस चटणीचीही स्वतःची अशी वेगळी चव आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना खूश करते. आंबट-गोड चवीमुळे ही चटणी सर्व वयोगटातील लोकांनाही फार आवडते.टोमॅटो चटणी (Tomato chutney) : टोमॅटो चटणीची स्वतःची अशी वेगळी चव आहे. दक्षिण भारतीय पाककृतीमध्ये या चटणीला इडली, डोसा, उपमा आणि वड्यासोबत खायला दिले जाते.कच्च्या आंब्याची चटणी (Mango chutney) : या आंब्याची आंबट-गोड चटणी उन्हाळ्याच्या काळात घरी बनविली जाते. ही चटणी तुम्ही रोटी आणि पराठ्यासोबतही खाऊ शकता.टोमॅटो-कांदा चटणी (Tomato-onion chutney) : टोमॅटो-कांद्याची चटणी लसणात मिसळून घरी बनवली जाते. पण, तुम्ही ढाब्यावरही या स्वादिष्ट चटणीचा आस्वाद घेऊ शकतो.पुदिना चटणी : ही चटणी घरामध्ये सहजरित्या बनविली जाते. या चटणीचा सुगंध अन्नाची चव वाढवण्यास मदत करतो.चिंचेची चटणी (Tamarind chutney) : भारतीय न्याहरीत चिंचेला फार महत्व आहे. त्यामुळे ही चटणी पापड, समोसे, दही वडा आणि आलू टिक्कीसोबत खाऊ शकता.सफरचंद चटणी (Apple chutney) : सफरचंदाची चटणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. ती चटणी तुम्ही स्नॅक्ससह खाऊ शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.