Forbes India Rich List 2021 Forbes
फोर्ब्ज या प्रसिद्ध अमेरिकन मासिकाकडून दरवर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात येते. या यादीत पहिले १० स्थान पटकावणारे भारतीय कोण, ते पाहुयात..
या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. २००८ पासून त्यांनी आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती ९२.७ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
उद्योगपती गौतम अदानी हे सलग तिसऱ्या वर्षी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत जवळपास तिप्पट वाढ पहायला मिळतेय. त्यांची एकूण संपत्ती ७४.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.तिसऱ्या क्रमांकावर एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३१ अब्ज डॉलर्स आहे. डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी हे चौथ्या क्रमांकावर आहेत. २९.४ अब्ज डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पूनावाला पाचव्या स्थानी आहेत. १९ अब्ज डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे. ‘आर्सेलर मित्तल’चे मालक लक्ष्मी मित्तल हे १८.८ अब्ज डॉलर्स संपत्तीसह सहाव्या स्थानी आहेत. ओपी जिंदल ग्रुपच्या सावित्री जिंदल या सातव्या स्थानी आहेत. १८ अब्ज डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे. कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक १६.५ अब्ज डॉलर्स संपत्तीसह आठव्या स्थानी आहेत.
शापूरजी पालोनजी समूहाचे पालोनजी मिस्त्री हे नवव्या क्रमांकावर आहेत. १६.४ अब्ज डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे.
Vi चे प्रमुख कुमार बिर्ला हे १५.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या स्थानी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.