Forest Department Mahabaleshwar esakal
वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागानं (Railway Department) भाडेपट्ट्याचं नूतनीकरण न केल्यानं वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील हॉलीडे होमला (Holiday Home) टाळे ठोकले.
महाबळेश्वर (सातारा) : वारंवार नोटिसा बजावूनही रेल्वे विभागानं (Railway Department) भाडेपट्ट्याचं नूतनीकरण न केल्यानं वन विभागाकडून मध्य रेल्वेच्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथील हॉलीडे होमला (Holiday Home) टाळे ठोकले. मध्य रेल्वेच्या ताब्यात असलेली पाच एकर मिळकत वन विभागानं ताब्यात घेतली असून, ही मिळकत सील केल्याची माहिती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी (Shrikant Kulkarni) यांनी दिली.वन विभागानं (Forest Department Mahabaleshwar) वेण्णा लेकच्या मागील बाजूच्या क्षेत्रातील महाबळेश्वर रस्त्यावर फॉरेस्ट सर्व्हे नंबर २२३ मधील पाच एकर जागा १९७८ मध्ये मध्य रेल्वेला दहा वर्षांसाठी भाडेपट्टा करारानं दिली होती. या जागेत मध्य रेल्वेनं आपले हॉलीडे होम बांधले. हा करार १९८८ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर मध्य रेल्वेनं कराराचं नूतनीकरण करणं आवश्यक होतं; परंतु नूतनीकरण न केल्यानं वन विभागानं ही मिळकत ताब्यात घेतली. त्यानंतर रेल्वेनं करार वाढवून घेतल्यानं वन विभागानं पुन्हा पाच एकर जागा मध्य रेल्वेकडे हस्तांतर केली.त्यावेळी केलेल्या कराराची मुदत संपुष्टात येताच वन विभागानं नोटिसा पाठवून कराराचं नूतनीकरण करण्याबाबत मध्य रेल्वेला सूचित केलं. तसंच नूतनीकरण न केल्यानं कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वन विभागानं दिला होता. तरी देखील मध्य रेल्वेनं याकडे दुर्लक्ष केलं. अखेर सातारा उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी केलेल्या सूचनेनुसार सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांनी मध्य रेल्वेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी विशेष पथकासह मंगळवारी रेल्वे हॉलीडे होम गाठले. तेथील रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून हॉलीडे होम ताब्यात घेतले. हॉलीडे होमच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाळे ठोकून ही पाच एकर मिळकत सील करण्यात आली.या कारवाईवेळी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रमेश गडदे, अभिनंदन सावंत आदी उपस्थित होते. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळं वन विभागाच्या मिळकतदारांचे धाबे दणाणले आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.