आज मैत्रीचा दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप-डे'. यानिमित्ताने पाहुयात असे काही बॉलिवूड कलाकार ज्यांच्या मैत्रीची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते.
मलायका अरोरा, करीना कपूर, अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर या बॉलिवूड अभिनेत्रीं एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. 'गुंडे' या चित्रपटामधील रणवीर आणि अर्जुनच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अनेकवेळा रणवीर आणि अर्जुन एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही जातात. त्या दोघांनी मिळून अनेक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे.चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीचा रणबीर कपूर हा खास मित्र आहे. अयानच्या ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटामध्ये रणवीर प्रमुख भूमिका साकारणार आहे. रणबीरसोबतचे शूटिंगसेटवरील मज्जा मस्तीचे व्हिडीओ आणि फोटो अयान सोशल मीडियावर नेहमी शेअर करतो.सलमान खान आणि संजय दत्त हे देखील जवळचे मित्र आहेत. संजय जेव्हा पुण्यातील कारागृहातून बाहेर आला होता तेव्हा सलमानने त्याला घ्यायाला त्याच्या वैयक्तिक बॉडीगार्ड शेराला त्याच्या सुरक्षेसाठी पाठवले होते. सलमान आणि संजयने साजन, चल मेरे भाई या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केले आहे.बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आणि करण जोहर या दोघंची गेली कित्येक वर्ष मैत्री आहे. अनेक शोमध्ये ते एकत्र दिसतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.