भारतासह जगभरातील राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळं लोकांच्या मनात त्या नेत्यांबद्दल हळहळ निर्माण झाली. आज अशीच राजकीय व्यक्तिमत्वं पाहुयात...
भारतासह जगभरातील राजकीय नेत्यांनी आपला जीव असा गमावलेला आहे, ज्यामुळं लोकांच्या मनात त्या नेत्याबद्दल हळहळ निर्माण झाली. आज अशीच राजकीय व्यक्तिमत्वं पाहुयात...महात्मा गांधी (Mahatma Gandhi) : स्वातंत्र्यानंतर 30 जानेवारी 1948 या दिवशी गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्लीतील सभेत सकाळच्या प्रार्थनेसाठी जाताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांची हत्या नथुराम गोडसे या युवकानं केली. नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचा सदस्य होता, महात्मा गांधींची हत्या करण्यामागचं कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानची निर्मिती.इंदिरा गांधी (Indira Gandhi) : 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पडल्या. त्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होत्या. त्याच वेळेस अचानक जवळच असलेल्या बेअंत सिंह यानं इंदिरा गांधी यांच्यावर त्याच्या कडील सर्विस रिवाल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या आणि तो के सतवंत सिंहवर ओरडला बघतोस काय गोळ्या झाड.. सतवंत सिंह यानंही त्याच्याकडील बंदुकीतून इंदिरा गांधी यांच्या दिशेनं फैरी झाडल्या. इंदिरा गांधी यांना त्वरित एम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं. चार तासानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.राजीव गांधी (Rajiv Gandhi) : श्रीलंकेत एलटीटीईचा तामिळ बंडखोर प्रभाकरन याच्या कारवाया वाढलेल्या होत्या. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित व्हावी, या कारणासाठी राजीव गांधींनी तिकडं शांती सैन्य पाठवलं. भारतानं केलेल्या कारवाईमुळं एलटीटीला श्रीलंकेत पराभूत व्हावं लागलं. याचाच राग मनात धरून थेईमनोजी राजरत्नम उर्फ धानू या एलटीटीईच्या कार्यकर्तीनं राजीव गांधी जेव्हा श्रीपेरंबदूर इथं प्रचारासाठी आले होते. त्याच वेळेस त्यांना भेटायचं निमित्त करून तिकडं गेली! आणि खाली वाकून नमस्कार करता-करता स्वतःला लावलेल्या आरडीएक्स बॉम्बचा स्फोट केला. २१ मे १९९१ ला त्यांचा असा अंत झाला.प्रमोद महाजन (Pramod Mahajan) : महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचा अत्यंत संयमी, सुसंस्कृत आणि प्रभावी चेहरा म्हणजेच प्रमोद महाजन. २००१ ते २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते दूरसंचार मंत्री होते. २२ एप्रिल २००६ या दिवशी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या लहान भावानं म्हणजेच प्रवीण महाजन यानं प्रमोद महाजनांची गोळ्या झाडून हत्या केली. अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) : जॉन विल्क्स बूथनं 1865 मध्ये अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या केली. त्या वेळी लिंकन थिएटरमध्ये जात होते.जॉन एफ. केनेडी (John F. Kennedy) : अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी हत्या ही इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजकीय हत्यांपैकी एक आहे. माजी मरीन ली हार्वे ओसवाल्ड यांनी डॅलसमध्ये मोटारसायकल चालवताना केनेडींना लक्ष्य केलं.मार्टिन ल्यूथर किंग (Martin Luther King) : अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचा चेहरा असलेल्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचीही हत्या झाली. मेम्फिसमधील एका मोटेलच्या बाल्कनीत उभे असताना जेम्स अर्ल रेने ल्यूथरला गोळ्या घातल्या.बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto) : 2007 मध्ये पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. रावळपिंडीत त्या रॅली काढत होत्या. त्यादरम्यान, आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.शिंजो आबे (Shinzo Abe) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा गोळीबार (8 जुलै 2022) करून हत्या करण्यात आली आहे. जपानच्या सरकारी मीडियानं निधनाच्या बातमीला दुजोरा दिलाय. जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेच्या वृत्तानुसार, जपानमधील नारा शहरातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.