उमरिया : नेहमीच्या व्यग्र दिनक्रमातून रजा घेऊन भटकंती करायला, छंद जोपासायला सर्वांनाच आवडते. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींनाही नेहमीच्या दिनक्रमातून रजा देण्यात आला आहे.
एका हत्तीचे दररोजचे खाद्य
नारळ : १० ते १५
सफरचंद : पाच किलो
केळी : पाच डझन
गूळ : दोन किलोBandhavgarh Tiger Reserve
त्यासाठी, सात दिवसांच्या गज महोत्सवाचे आयोजन केले आहेत.गज महोत्सवात त्यांचे लाड केले जात असून आवडते खाद्यपदार्थही दिले जात आहेत. एरवी या हत्तींकडून अभयारण्यात वाघांचा शोध घेण्यासह इतर कामे करून घेतली जातात.याबाबत उपविभागीय अधिकारी श्रद्धा पेंद्रे म्हणाल्या की, बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील ताला येथे शनिवारी गज महोत्सव सुरू झाला. हत्तींना नेहमीच्या कष्टप्रद जीवनातून काहीसा आराम देण्याचा या प्रकल्पाचा हेतू आहे. येत्या १० सप्टेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. या काळात हत्तींना स्नान घातले जाईल.''त्याचप्रमाणे, चंदन पावडर लावून आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातील. पर्यावरणासाठी प्राणीही इतर गोष्टींबरोबर तितकेच महत्वाचे असतात, हा संदेश या महोत्सवातून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.गज महोत्सवाबद्दल बोलताना माहूत राम दुलारे म्हणाले, की वर्षभर येथील हत्ती वाघांचा शोध घेणे व जंगलाशी संबंधित इतर कामे करण्यात व्यग्र असतात. मात्र, आठवडाभर हत्तींना या दिनक्रमातून ब्रेक दिला असून त्यातून त्यांना नवीन जोम, ऊर्जा मिळेल.या काळात हत्तींना तेलाने मसाज केला जात असून स्नान घातल्यानंतर त्यांना सजविले जात आहे. त्यांना केळी, सफरचंद, ऊसासारखे आवडीचे खाद्यही दिले जात आहे. सुट्टीचा आनंद घेणारे हत्ती पाहण्यासाठी पर्यटकांना बांधवगडमधील ताला येथील शिबीराला भेट देता येईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.