Sankeshwar Nilgar Ganpati esakal
श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या आख्यायिका हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे.
संकेश्वर (बेळगाव) : श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या आख्यायिका हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. सुमारे 300 वर्षांचा इतिहास असलेल्या येथील हेद्दूरशेट्टी घराण्याच्या निलगार गणपतीची किर्ती कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यात पसरलेली आहे. `नवसाला पावणारा` अशी या गणपतीवर भक्तांची सर्वदूर श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी उत्सवात तब्बल 25 लाखांवर भाविक दर्शन घेतात. या उत्सवामुळे संकेश्वर शहराला महिनाभर यात्रेचं स्वरुप येतं. गेल्या 20 वर्षात या उत्सवाची व्याप्ती खूपच वाढलीय.संकेश्वरातील निलगार गणपतीची माहिती खूपच रोचक आहे. मुळात हा गणपती हेद्दूरशेट्टी घराण्याचा घरगुती गणपती आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईश्वराप्पा सिद्धाप्पा हेद्दूरशेट्टी यांच्या काळापासून हा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या हेद्दूरशेट्टी परिवारातील शिवपुत्र, वीरभद्र व हणमंत हे तिघे बंधू उत्सवाची सर्व जबाबदारी पेलत आहेत. हा उत्सव थाट साजरा केला जातो.रंगकाम व्यवसायावरून `निलगारा`चं नामकरण : या नवसाच्या गणपतीचं `निलगार` असं नामकरण हेद्दूरशेट्टी यांच्या व्यवसायावरुन पडलं. हेद्दूरशेट्टी घराण्याचा सुतकताई व कपड्यांना रंगकाम करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यावरुन त्यांना निलगार नावानं ओळखलं जात. पुढे त्यांच्या गणपतीला `निलगार गणपती` हे नाव पडलं. सध्या कालपरत्वे हेद्दूरशेट्टी यांचा व्यवसाय बदलला, पण नाव मात्र कायम राहिलंय.सुतार कुटुंबीयांना मूर्ती बनविण्याचा मान : सुतार कुटुंबीयांना निलगार गणपतीची मूर्ती बनविण्याचा मान आहे. धोंडीबा सुतार यांचा मुलगा बाळकृष्ण सुतार व आता नातू पुंडलिक सुतार हे मूर्ती बनवितात. परंपरेप्रमाणे हेद्दूरशेट्टी कुटुंबीय सुतार यांना मानाचा विडा देऊन मूर्तीची बनविण्यास सांगतात. मूर्ती बनविण्याच्या कामाचा प्रारंभही मुहूर्त पाहूनच केला जातो.मूर्तीचा रंग लाल, उंची २७ इंच : संपूर्ण लाल रंगात रंगवलेली गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक असते. मूर्तीची उंची २७ इंच, लाल रंग व सजावट ठरलेली असते. त्यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. मूर्तीकाम केलेल्यांना आहेर व मानधन दिले जाते. मूर्तीचे छायाचित्र काढण्यास बंदी असते. या गणपतीला पिठी साखर, कापुर, दुर्वा व लाल फुल प्रिय आहे. संकष्टीनंतरच्या गुरुवारी किंवा सोमवारी विसर्जन : या गणपतीचं वास्तव्य किमान २१ दिवसांपुढे असतं. संकष्टीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी किंवा सोमवारी या गणपतीचं हिरण्यकेशी नदीपात्रात श्री शंकराचार्य मठासमोर विधीवत विसर्जन केलं जातं. दरम्यानच्या काळात दररोज हजारो भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात. यामध्ये नवीन लग्न झालेली जोडपी व शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. कोरोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून शासनाचे नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश देत आहोत. मुळात हा गणपती आमचा घरचा गणपती आहे. पण, अलीकडे येणाऱ्या भाविकांचे नवस पूर्ण करणारा निलगार गणपती म्हणून अशी त्याची ख्याती दूरवर पसरलीय. कोरोनाचं संकट असलं, तरी भक्ताची संख्याही वाढतच आहे. भाविकांना बाप्पाचे सुलभ दर्शन होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. : शिवपुत्र हेद्दूरशेट्टी, संकेश्वरसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.