जगात असे काही अनेक लोक आहेत, ज्यांना विचित्र छंद जोपासण्याची सवय झालीय. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या आयुष्यात 'भीती' नावाची कोणतीच गोष्ट नाही.
जगात असे काही अनेक लोक आहेत, ज्यांना विचित्र छंद जोपासण्याची सवय झालीय. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या आयुष्यात 'भीती' नावाची कोणतीच गोष्ट नाही. ही व्यक्ती गेल्या 30 वर्षांपासून जंगलात 130 फूट उंच लटकलेल्या पर्वताच्या माथ्यावर एकटी राहतेय. होय, ही व्यक्ती जॉर्जियाच्या जंगलात 130 फूट उंच पर्वतावर एकटी वास्तव्य करत आहे. ज्याला 'कात्सखी स्तंभ' म्हणूनही ओळखं जातं.कोण आहे ही व्यक्ती? : मॅक्सिम काव्टारड्जे (Maxime Qavtaradze) जो गेल्या 25 वर्षांपासून जॉर्जियातील या पर्वतावर राहत आहे. तो एक ख्रिश्चन फादर christian Monk असून या पर्वताच्या शिखरावर त्यानं 1500 वर्ष जुने एक छोटेखानी चर्चही बांधलंय. या फादरचं वय 63 वर्षे आहे. मात्र, हे वाढते वय असूनही तो 130 फूट उंचीवरून दररोज दोनदा खाली उतरतो आणि चढतो.फादर (Monk) बनण्यापूर्वी मॅक्सिम क्रेन ऑपरेटर होता : फादर होण्यापूर्वी मॅक्सिम काव्टारड्जेनं क्रेन ऑपरेटर म्हणूनही काम केलंय. लहान वयातच त्याला ड्रग्ज आणि अल्कोहोलचं व्यसन जडलं आणि या कारणामुळं त्याला अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला.मात्र, तुरुंगात त्याला बायबलचा Bible अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि बायबलमधून त्यानं आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यानं ख्रिश्चन फादर बनण्याचा निर्णय घेऊन आपल्या जीवनाला सुरुवात केली.हाच पर्वत का निवडला? : जर आपण जॉर्जियाचा (Georgia) इतिहास पाहिला, तर शतकांपूर्वी ख्रिश्चन पंथाचे लोक एकटेपणासाठी उंच पर्वत किंवा जंगलाच्या शिखरावर राहत असत. परंतु, जेव्हा जॉर्जियामध्ये ओटोमन साम्राज्य पसरलं, तेव्हा सर्व फादर आणि ख्रिश्चन पंथांना जॉर्जियाला सोडून जावं लागलं. हे सर्व 15 व्या शतकापर्यंत चालूच राहिलं, ज्यामुळे सर्व निर्जन ठिकाणं उद्ध्वस्त झाली. त्यापैकी एक 'कात्सखी स्तंभ' (Katskhi Pillar) देखील होता. जो शतकानुशतके उजाड राहिला. लोक अशा ठिकाणी जाण्यास घाबरत होते, परंतु मॅक्सिमने या लटकलेल्या पर्वताला आपलं निवासस्थान बनवलं.फादर मॅक्सिम सांगतो, या पर्वतावरून तो देवाला स्वतः जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. त्याला शरण जातो. त्यानं या धोकादायक पर्वतावर एक लहान झोपडी देखील बांधलीय. त्यात प्रार्थना हॉल देखील आहे.या झोपडीत काही पुजारी आणि काही त्रासलेले तरुण अधूनमधून प्रार्थना करण्यासाठी येत असतात, असं तो सांगतो. येथे पोहचण्यासाठी ते लोक सर्व 131 फूट लोखंडी पायऱ्या चढून येतात, ज्यामुळे पर्वतावरून खाली उतरायला 20 ते 30 मिनिटे लागतात.'मॅक्सिम चर्च' म्हणूनही पर्वताची ओळख : विशेष म्हणजे, हे चर्च (Church) 'मॅक्सिम' या नावानं देखील ओळखलं जातं. बऱ्याच लोकांना ते 'चर्च ऑफ सेंट मॅक्सिमस द कन्फेसर' म्हणूनही माहीत आहे. हे चर्च आज पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनलं असून येथे दररोज हजारो लोक हजेरी लावत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.