Valentine's Day Gift Option : 'व्हॅलेटाईन डे'ला सर्वांना आपल्या जोडीदाराला खूश करायचे असते. जोडीदाराला आवडेल असे आपल्या बजेटमध्ये काय गिफ्ट द्याव हे समजत नाही. तुम्हाला आपल्या जोडीदाराला काय गिफ्ट द्यावे समजत नसेल तर आम्ही तुमचे काम सोपे करतो. वॉच, फिटबँड, फायर टिव्ही स्टीक, एअरपॉड्स, इअरबर्ड सारखे गॅजेट, अॅक्सेसरीज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्हाला या व्हॅलेंटाईला आपल्या पार्टनर गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ५ हजार पेक्षा कमी किंमतीमधील बेस्ट गॅजेट ऑप्शन उपलब्ध आहेत. कोणते ते जाणून घेऊ या?
वन प्लस स्मार्ट बँड ( OnePlus Smart Band)
वन प्लस स्मार्ट बँड एक चांगला गिफ्टचा पर्याच आहे. हा ड्युएल कलर स्ट्रॅपमध्ये मिळतो ज्यामुळे यूजर सह स्विज करू शकतो. हा स्लीप मॉनीटर करू शकतो. तसेच ब्लड ऑक्सिजन लेवल देखील सांगतो. अॅमेझॉनवर हा १६९९ रुपयांमध्ये मिळत आहे.
एमआय स्मार्ट बँड ६ (Mi Smart Band 6) : एमआय स्मार्ट बँन्ड ६ शिओमीच्या फिटनेस बँन्ड सेगमेंट लेटेस्ट डिव्हाईस आहे. हा 1.56-इंच AMOLED टच स्क्रीन डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे. फिटनेस बँडसोबज युजर्सला ऑक्सीजन लेव्हल आणि हार्ट बीट ट्रॅट करता येऊ शकतात. याची 5ATM वाटर रेसिस्टेंट रेटिंग पाहाता तुम्ही स्मिमिंग करताना देखील वापरू शकता. अॅमेझॉनवर हा ३४९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
SilverX M5 स्मार्ट बँड SilverX M5 Smart Band
SilverX M5 फिटनेस बँडमध्ये 1.1-इंच AMOLED टच डिस्प्ले दिला आहे आणि 5ATM वॉटर रेझिस्टन्सची सुविधा देते, ज्यामुळे ते पोहण्यासाठी फायदेशीर आहे. हे तणावाचे निरीक्षण करते आणि तणाव पातळी कमी करते. युजर्स त्यांच्या फोन, कॅमेरा शटर आणि कॉलवरील ऑडिओ ट्रॅक नियंत्रित करण्यासाठी या बँडचा वापर करू शकतात. Amazon वर याची किंमत 749 रुपये आहे.
बोट एक्टेंड स्मार्टवॉच (boAt Xtend Smartwatch)
तुमच्यापैकी जे लोक कमी बजेटमध्ये चांगले स्मार्टवॉच गिफ्ट देऊ इच्छित आहात त्यांसाठी बोट एक्टेंड स्मार्टवॉच हा चांगला पर्याय आहे. यामध्ये अलेक्सा वॉयस असिस्टेंट इन बिल्ट पर्याय आहे. तसेच यामध्ये एक मोठा १. ६९ इंच एलसीडी डिस्प्ले आहे जो आरोग्यासाठी चांगला आहे आणि ह्रदयाची ठोके आणि SPO2 वर लक्ष ठेवतो. अॅमेझॉनवर २९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
नॉईस कलरफिट प्लस स्मार्टवॉच( Noise ColorFit Pulse Smartwatch)
यूजरने जेव्हापण तुम्ही फिजिकल अॅक्टिव्हिटीसाठी बाहेर पडणार असाल तेव्हा ८गेम मोड निवडू शकता. ते तुमच्या हेल्थ मॅट्रीक चांगल्या प्रकारे समजण्यामध्ये तुमची मदत करतो आणि ह्रदयाची गती आणि SpO2 मॉनिटर ट्रॅक करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.