Glamorous and Beutiful Female Tennis Stars of Russia Sakal
गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. या युद्धामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चौफेर विरोध होत आहे. पुतीन यांना केवळ जगातच नव्हे, तर रशियातूनही विरोध होत आहे. रशियाचे प्रसिद्ध टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव आणि आंद्रे रुबलेव्ह यांनीही या युद्धाला विरोध केला आहे. रशियाच्या महिला टेनिसपटूंनीही युद्धाला विरोध दर्शवला आहे. जागतिक क्रमवारीत टॉप-50 मध्ये रशियाच्या 5 महिला टेनिसपटू आहेत. या खेळाडू फक्त जागतिक क्रमवारीतच नाहीत तर ग्लॅमरच्या बाबतीतही टॉपला आहेत. (Glamorous and Beutiful Female Tennis Stars of Russia)
1. काही वर्षापूर्वी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) 26 फेब्रुवारी 2020 रोजी निवृत्ती पत्करली. ती एक अतिशय सुंदर आणि शानदार खेळाडू देखील होती. तिने 5 ग्रँडस्लॅम जिंकले.30 वर्षीय अनुभवी अनास्तासिया पावल्युचेन्कोव्हा (Anastasia Pavlyuchenkova)जागतिक क्रमवारीत 14 व्या क्रमांकावर आहे. तिने आपल्या कारकिर्दीत 12 एकेरी विजेतेपद पटकावली आहेत. ती अजून एकही ग्रँडस्लॅम जिंकू शकली नाही, परंतु ती 2021 मध्ये फ्रेंच ओपनची फायनल खेळली होती.24 वर्षीय वेरोनिका कुडरमेटोवा (Veronika Kudermetova) जागतिक क्रमवारीत 25व्या क्रमांकावर आहे. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग आहे. चार वर्षांच्या कारकिर्दीत तिला एकही ग्रँडस्लॅम जिंकता आलेला नाही. परंतु एकेरीमध्ये एक विजेतेपद पटकावले आहे.
२४ वर्षीय डारिया कासात्किना (Daria Kasatkina) या क्रमवारीत २८व्या क्रमांकावर आहे. तिचे सर्वोत्तम रँकिंग 10 आहे. डारियाने तिच्या कारकिर्दीत 4 एकेरी विजेतेपद पटकावली आहेत. परंतु तिनं एकही ग्रँड स्लॅम जिंकलेले नाही. ती दोनदा फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.
23 वर्षीय ल्युडमिला सॅमसोनोव्हाला (Liudmila Samsonova) तिच्या 4 वर्षांच्या कारकिर्दीत एकही ग्लॅम विजेतेपद जिंकता आलं नाही. जागतिक रँकिंगमध्ये ती 34व्या स्थानी आहे.
27 वर्षीय एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा (Ekaterina Alexandrova) या क्रमवारीत 50 व्या क्रमांकावर आहे. तिची सर्वोत्तम क्रमवारी 25 आहे. एकेरीचं विजेतेपद पटकावणाऱ्या एकतेरीनाला 7 वर्षांच्या कारकिर्दीत एकही ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकता आले नाही. परंतु तिने आतापर्यंत 327 पैकी 203 एकेरी सामने जिंकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.